Download App

नितीश कुमार यांचं चुकलंच, KCR यांनी थेट आमंत्रणच नाकारलं; बैठकीआधीच मिठाचा खडा!

Bihar Politics : विरोधकांच्या एकजुटीच्या प्रयत्नात असलेल्या नितीश कुमारांना (Nitish Kumar) झटक्यांवर झटके बसत आहेत. काँग्रेस, आप, तृणमूल काँग्रेसच्या राजकारणाने हैराण झालेल्या नितीश कुमार यांना तेलंगाणाचे मु्ख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांनी जोरदार झटका दिला आहे. मुख्यमंत्री राव यांनी या बैठकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, केसीआर 23 जून रोजी पटना येथे होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. त्यांनी याबाबत नितीश कुमार यांना कळवले आहे. केसीआर विरोधकांच्या अशा कोणत्याच रणनितीत सहभागी होण्यास तयारीत नाहीत. याचे कारण म्हणजे त्या ठिकाणी काँग्रेसही आहे.

Letsupp Special : केसीआर उडवणार धमाका; 8 माजी आमदार पक्षात दाखल; आणखी 10 लागले गळाला

पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले, की आम्ही नेहमीच बिगर काँग्रेस आणि बिगर भाजपा आघाडीचे धोरण ठेवत आलो आहोत. ही बैठक या तत्वाच्याच विरोधात आहे. याच कारणामुळे काँग्रेस सहभागी असलेल्या बैठकीत भारत राष्ट्र समिती उपस्थित राहण्यास तयार नाही. पक्षाने सांगितले की हा निर्णय विचार करूनच घेण्यात आला आहे.

तसे पाहिले तर, काँग्रेस तेलंगणात विरोधी पक्षात आहे. केसीआर यांच्या पक्षाने 2018 मध्ये 88 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिला. काँग्रेसने येथे 19 जागा जिंकल्या. अशा परिस्थितीत जर केसीआर यांचा पक्ष आणि काँग्रेस एकाच व्यासपीठावर दिसले तर मतदारांत चुकीचा संदेश जाईल, असे सांगण्यात येत आहे.

केसीआर यांची मुलगी सातत्याने केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीच्या फेऱ्यात आहे. अशा परिस्थितीत चंद्रशेखर राव केंद्रातील भाजपविरोधात प्रखर भूमिका घेण्यास तयार नाहीत. तसेच स्वतः राव यांनीच विरोधकांची आघाडी तयार करण्यासाठी मुख्य रणनितीकाराची भूमिका बजावली होती. अशा वेळी या बैठकीत सहभागी झाल्यास त्यांची हे पदही जाऊ शकते.

PM मोदींचे OSD झाले देशाच्या अर्थमंत्र्यांचे जावई; चर्चा मात्र सीतारामन कुटुंबीयांच्या साधेपणाची!

2019 च्या लोकसभा निवडणुकांआधी केसीआर आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरोधी पक्षांची आघाडी तयार करण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांनी जानेवारी 2019 मध्ये एक रॅलीही आयोजित केली होती. यामध्ये अनेक विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते. मात्र या राजकारणाला फारसे यश मिळू शकले नाही.

Tags

follow us