Download App

“मोदीजी, पाकिस्तानचे दोन तुकडे करा, POK भारतात विलीन करा”, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याची चर्चा

आता पाकिस्तानचे दोन तुकडे करण्याची वेळ आली आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पीओके भारतात विलीन करण्याचे आवाहन करतो.

Revanth Reddy Speech on Narendra Modi Government : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत सरकारने पाकिस्तान विरुद्ध कठोर निर्णय घेतले आहेत. हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कसून शोध घेतला जात आहे.  या हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात असल्याचे (Pakistan) आरोप होत आहेत. तर दुसरीकडे भारतातील विरोधी पक्षांनीही मोदी सरकारला या मुद्द्यावर पाठिंबा दिला आहे. यातच आता तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांचे (Revanth Reddy) भाषण चांगलेच गाजत आहे. आता पाकिस्तानचे दोन तुकडे करण्याची वेळ आली आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना  (PM Narendra Modi) पीओके भारतात विलीन करण्याचे आवाहन करतो. आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत, असे सीएम रेड्डी म्हणाले आहेत.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ हैदराबाद शहरात कँडल मार्च काढण्यात आला होता. या मोर्चात मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी जोरदार भाषण केले. रेड्डी म्हणाले, 1971 मध्ये जेव्हा पाकिस्तानने आपल्या देशावर हल्ला केला तेव्हा इंदिरा गांधींनी चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते. आताही आपल्याला पाकिस्तानविरुद्ध अशीच कारवाई करावी लागणार आहे.

आता तुम्ही (पंतप्रधान मोदी) दु्र्गा मातेचं स्मरण करा आणि कारवाई करा. मग तो पाकिस्तावर थेट हल्ला असो की आणखी एखादा उपाय असो. आता तडजोड करण्याची वेळ राहिलेली नाही. पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई झालीच पाहीजे. सरकारने यावर आता पुढे गेलं पाहीजे आम्ही 140 कोटी भारतीय तुमच्यासोबत आहोत असे रेड्डी म्हणाले. आता पाकिस्तानचे दोन तुकडे करा. पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन करुन टाका. आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुम्ही दुर्गामातेचे भक्त आहात असेही रेड्डी म्हणाले.

पाकिस्तानात काय काय घडलं

भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय सुरक्षा समितीची एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर पाकिस्तानही कठोर प्रतिक्रिया देईल असे सांगण्यात आले. पाकिस्तानने नौदलालाही अलर्ट मोडवर ठेवले आहे. पाकिस्तानला अशी भीती वाटत आहे की भारत एखाद्या कारवाईत नौदलाचा वापर करू शकतो. यामुळेच पाकिस्तान सरकारने दोन दिवसांची फायरिंग वॉर्निंग जारी केली गेली होती. भारताने जसे निर्णय घेतले त्याच पद्धतीचे निर्णय पाकिस्ताननेही भारताविरुद्ध घेतले आहेत.

“पाकिस्तानने हत्यारे लोड केली अन्..” भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान भेदरला

follow us