Download App

Telangana News : तेलंगणा निवडणुकीत व्यस्त, आंध्रने थेट ‘पाणी’च पळवलं; वादाचं कारण काय?

Telangana News : तेलंगणात निवडणुकांची रणधुमाळी सुरू (Telangana Elections 2023) असतानाच आंध्र प्रदेश आणि तेलंगणात वाद उफाळून आला आहे. या वादाला कारण ठरल आहे नागार्जुन सागर धरणाचं पाणी. कृष्णा नदीवर बांधण्यात आलेल्या या धरणावर (Nagarjuna Sagar) ताबा मिळवत पाणी सोडण्याचे काम आंध्र प्रदेशने सुरू केले आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांत तणाव निर्माण झाला आहे. गुरुवारी ज्यावेळी तेलंगणातील बहुतांश अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असतानाच आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) जवळपास सातशे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी धरणाचे दरवाजे उघडून पाचशे क्युसेक वेगाने पाणी सोडले.

यानंतर आंध्र प्रदेशचे जलसिंचन मंत्री अंबाती रामबाबू यांनी प्रतिक्रिया दिली. पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही धरणाच्या (Krishna River Dispute) उजव्या कालव्यातून पाणी सोडत आहोत. आंध्र प्रदेश आणि तेलंगणात झालेल्या करारात नमूद केल्यानुसारच पाणी घेतले आहे. आम्ही कोणत्याही कराराचे उल्लंघन केलेले नाही. कृष्णा नदीतील 66 टक्के पाणी आंध्र प्रदेशच्या तर 34 टक्के पाणी तेलंगणाच्या हिश्श्याचे आहे. ज्या पाण्यावर आमचा अधिकार नाही त्यातील एकही थेंब पाणी आम्ही घेतलेलं नाही.

Telangana Election: काँग्रेसचे उमेदवार जी विवेकानंद सर्वात श्रीमंत उमेदवार, किती संपत्ती वाचा ?

आंध्र प्रदेशच्या या कार्यवाहीमुळे दोन्ही राज्यांत तणाव वाढत असल्याचे लक्षात येताच केंद्र सरकारने हस्तक्षेप केला आहे. धरणातून सोडलेले पाणी पुन्हा वापस करण्याचे आवाहन केंद्राने दोन्ही राज्यांना केले आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी दोन्ही राज्यांबरोबर झालेल्या एका बैठकीत हा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर दोन्ही राज्य सहमत झाले आहेत. येथून पुढे वाद होऊ नये यासाठी धरणाची निगराणी करण्याचे काम आता केंद्रीय राखीव पोलीस दल करेल. दोन्ही राज्यांना त्यांच्या करारानुसार पाणी मिळत आहे की नाही याचीही खात्री पोलीस दलाकडून केली जाईल.

गुरुवारी तेलंगणार राज्याच्या मुख्य सचिव शांति कुमारी यांनी आरोप केला की आंध्र प्रदेशचे जवळपास पाचशे पोलीस कर्मचाऱ्यांनी नागार्जुन धरण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तोडले. त्यानंतर गेट नंबर 5 वर असलेले रेग्युलेटर उघडून जवळपास पाच हजार क्युसेक पाणी सोडले. आंध्र प्रदेशच्या या कार्यवाहीमुळे तेलंगणात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असा आरोप शांती कुमारी यांनी केला होता. त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला होता.

Telangana Election : 35 वर्षात तब्बल 237 निवडणुका; KCR यांना टक्कर देणारा ‘इलेक्शन किंग’ कोण?

Tags

follow us