Download App

‘इंडिया’ची पहिली सभा ठरली! भोपाळमध्ये ‘इंडिया’ आघाडीची जाहीर सभा…

भोपाळमध्ये इंडिया आघाडीची पहिली सभा होणार पार पडणार असल्याची माहिती इंडिया आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. इंडिया आघाडीची ही पहिली सभा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. नवी दिल्लीत आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत कें.सी. वेणूगोपाल यांनी माहिती दिली आहे.

अनंतनागमध्ये दुर्देवी घटना; दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत तीन अधिकारी शहीद

या बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाबाबत चर्चा होणार असल्याचं बोललं जात होतं, या बैठकीत इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांच्या जागावाटपाबाबत प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती के. सी. वेणूगोपाल यांनी दिली आहे. सहकारी पक्षांशी बोलणी करुन याबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला जाणार असल्याचंही वेणूगोपाल यांनी स्पष्ट केलं आहे.

‘शासन आपल्या दारी अन् खर्च सर्वसामान्यांच्या माथ्यावरी’; जयंत पाटलांनी सरकारला घेरलं

इंडिया आघाडीची पहिली जाहीर सभा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे, अशी घोषणा वेणूगोपाल यांनी केली. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने इंडिया आघाडी प्रचारदौरे करणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी मंगळवारी उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली.

रोहित बोलला अन् टीम इंडियानं ठरवलं; फक्त 8 दिवसांत केला ‘हा’ चमत्कार

दरम्यान, मुंबईतल्या पवारांच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्यानंतर इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक आणि राज्यातली सध्याची राजकीय परिस्थिती यावर चर्चा केल्याचं बैठकीनंतर नेत्यांनी सांगितलं आहे.

आगामी निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी इंडिया पक्षाकडून जोरदार हालचाली सुरु करण्यात आल्या असून भोपाळमध्ये पहिली जाहीर सभा पार पडल्यानंतर देशातील तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांकडे लक्ष वेधणार असल्याचं इंडियाच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपसमोर इंडिया आघाडीचं एक मोठं आव्हान उभं असणार आहे, अशी चर्चा रंगू लागली आहे.

Tags

follow us