प्रत्येक वर्षी 7 जूनला पाऊस पडेल अशी सर्वांना आशा असते. मात्र यंदा 16 जून उजडला आहे तरीही मॉन्सूनचा काही पत्ता नाही. (Monsoon) 15 जूनला मुंबईसह राज्यात मॉन्सून दाखल होईल, असा अंदाज होता. मात्र, अरबी समुद्रातच मॉन्सून रेंगाळत आहे. राज्यात पेरण्या रखडल्या आहेत. शेतकरी चिंतेत आहे. त्यातच एल निनोचही संकट घोंगावत आहे. प्रशांत महासागरात एस निनो सक्रिय झाल्याने चिंता वाढली आहे. आज भारतीय हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा इशारा दिला. पुढील काही दिवस राज्यासाठी धोक्याची घंटा असणार आहे.
मॉन्सून बंगालच्या उपसागरातून पुढं वाटचाल करत आहे. तेलंगणा, ओडिसा, झारखंड, बिहार या राज्यात मॉन्सून पुढे सरकताना दिसत आहे. मात्र, आठवडाभरापासून अरबी समुद्रात मॉन्सूनची स्थिती जैसे थेच आहे. ही अत्यंत धोक्याची घंटा आहे. मॉन्सून तिथेच रखडत आहे. ज्यामुळे राज्यात मॉन्सून दाखल होण्यास यापेक्षाही जास्त काळ लागू शकतो. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, ओडिसा, बिहार येथे मॉन्सून पुढील 4 ते 5 दिवसात सक्रिय होण्याचा अंदाज आहे.
जर पुढील 2 ते 3 दिवस अरबी समुद्रात मॉन्सूनची स्थिती जैसे थे राहिली तर धोका निर्माण होऊ शकतो. पुर्ण जून महिना कोरडा जाण्याची शक्यता आहे. 20 जूनला राज्यात मॉन्सून दाखल होण्याचा अंदाज देण्यात आला. शेतकऱ्यांनी मॉन्सूनच्या भरोश्यावर पेरण्या केल्या नाहीत. लवकर राज्यात मॉन्सून दाखल होणं आवश्यक आहे. मात्र, अरबी समुद्रात स्थिती पूर्णपणे उलटी आहे. काही हालचाल मॉन्सूनची पुढे सरकताना दिसत नाही.
कोकण, विदर्भात आज उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला. कृषी विभागाकडून अगोदरच शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले की, जोपर्यंत सांगितले जात नाही तोपर्यंत पेरण्या करणे टाळा. राज्यात मॉन्सूनचा पाऊस पुढे पुढे जाताना दिसत असताना धाकधूक वाढली आहे. पुढील काही दिवस अत्यंत महत्वाची आहेत.
