Download App

‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे 69 राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीत नाव…

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाने 39 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत स्थान मिळवले आहे. काश्मीरमधील पंडितांवर झालेल्या अत्याचारावर आधारित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यानंतर हा चित्रपट चांगलाच वादग्रस्त ठरल्याचं समोर आलं होतं. अखेर ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारात सामाजिक चित्रपट म्हणून नर्गिस दत्त पुरस्कार जाहीर झाला तर अभिनेत्री पल्लवी जोशी हिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

बारामतीचे रस्ते चकाचक पण बीडचे खड्डे कधी भरणार? शेतकरी पुत्राचा अजित पवारांना खडा सवाल…

द काश्मीर फाइल्स प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी चित्रपटावर ताशेरे ओढल्याचं पाहायला मिळालं होतं. बॉलिवूडसह टॉलिवूड चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी टीका-टीपण्ण्या केल्या होत्या. या चित्रपटावरुन अभिनेते प्रकाश राज आणि विवेक अग्निहोत्री यांच्यात जोरदार ट्विटरवॉर झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर प्रकाश राज यांच्या टीकेवर अग्निहोत्री यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.

Prakash Raj यांनी केलं ‘विक्रम लँडर’चं तोंडभरून कौतुक! ‘चांद्रयान ३’च्या यशावर म्हणाले…

काही तासांपूर्वीच 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली. द काश्मीर फाइल्स’व्यतिरिक्त या राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीमध्ये ‘गंगुबाई काठीयावाडी’ या चित्रपटाने बाजी मारली आहे. तर ‘मिमी’, ‘पुष्पा’, ‘आरआरआर’, ‘सरदार उधम’ चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे. याबरोबरच ‘एकदा काय झालं’ आणि ‘गोदावरी’ या दोन मराठी चित्रपटांनाही राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत.

काश्मीर फाइल्सला राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा नर्गिस दत्त पुरस्कार जाहीर करण्यात आला असून विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि चिन्मय मांडलेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Tags

follow us