मद्रास हायकोर्टाच्या मदुरई पीठाने अलिकडे लिव्ह-इन प्रकरणात (BJP) एक महत्वाची टिप्पणी केली आहे. पुरातनकाळात गंधर्व विवाहासारखे एकत्र लिव्ह – इन – रिलेशनशिपमध्ये रहाणाऱ्यांना महिलांना पत्नीचा दर्जा मिळायला हवा. हायकोर्टाने नाते लिव्ह इन शिप नात्यातील महिलांची सुरक्षितता कायम करणे कायद्याचे काम आहे. कोर्टाने टिप्पणी करताना सांगितले की आधुनिक सामाजिक ढाच्या कमजोर महिलांची संरक्षण करण्याची जबाबदार न्यायालयांची आहे.कारण लिव्ह-इन संबंधात त्यांना कायद्याचे तसं संरक्षण मिळत नाही जसे विवाहित महिलांना मिळत असते.
तामिळनाडू येथील तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील मनप्पराई महिला पोलिस ठाण्यात अटक झालेल्या एक व्यक्तीची अंतरिम जामीनाची याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. या व्यक्तीवर आरोप होता की त्याने लग्नाचे खोटे आश्वासन देत महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आणि नंतर लग्नास नकार दिला. लाईव्ह लॉच्या बातमीनुसार कोर्ट म्हणाले की, लिव्ह – इन रिलेशनशिपमध्ये महिलांना गंधर्व विवाह वा प्रेम विवाहाअंतर्गत पत्नीचा दर्जा देऊन संरक्षण द्यायला हवे. ज्यामुळे अशा संबंधात अस्थिरता होण्याच्या स्थितीत त्यांना पत्नीच्या रुपात अधिकार मिळावे.
भाजपचा मास्टर स्ट्रॅटेजिस्ट! तावडे बिहारप्रमाणे केरळमध्येही तोच करिष्मा दाखवू शकणार?
सरकारी पक्षाच्या अनुसार आरोपी व्यक्ती लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये रहाताना महिलेचे शोषण करत होता. या दरम्यान तो लग्नाचे आश्वासन देखील देत होता, परंतू त्यानंतर त्याने लग्नास नकार दिला. प्रकरणानंतर अटक झाल्यानंतर त्याने जामीनसाठी अर्ज केला होता. ही याचिका फेटाळात कोर्टाने आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 69 अंतर्गत प्रथम दर्शनी गु्न्हा असल्याचे मान्य केले. हे कलम धोक्याने वा लग्नाचे आमीष दाखवून लैंगिक संबंधांना गुन्हेगारी कृत्य मानले जाते.
न्यायमूर्ती एस. श्रीमथी यांनी म्हटले की आधुनिकतेच्या नावाखाली अनेक पुरुष कायदेशीर डावपेचा फायदा उचलत असतात. जेव्हा संबंध बिघडतात तेव्हा महिलांच्या चारित्र्यावर शितोंडे उडवतात.पुरुष स्वत:ला आधुनिक म्हणतात, परंतू नाते तुटताच महिलांना बदनाम करतात. भारतात लिव्ह-इन रिलेशनशिपला भलेही अजूनही सांस्कृतिक रुपाने धक्कादायक मानले जाते. परंतू हे समाजात आता सर्वसामान्य झाले आहेत. अनेक तरुणी आधुनिक जीवनशैली स्विकारताना अशा संबंधांना तयार होतात, परंतू त्यांना नंतर कळते की त्या कायदेशीररित्या तशा सुरक्षित नाहीत, जशा विवाहित महिलांना संरक्षण मिळते.
