… तर पुरुषांना दोन लग्न करावे लागेल, नितीन गडकरी असं का म्हणाले?
Nitin Gadkari On Live In Relationship : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या कामासह त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. तर आता त्यांनी लिव्ह-इन रिलेशनशिप (Live In Relationship) आणि समलैंगिक विवाहावर (Same-sex marriage) मत मांडले आहे ज्याची चर्चा संपूर्ण देशात सध्या जोराने सुरु आहे. एका युट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी लिव्ह-इन रिलेशनशिप आणि समलैंगिक विवाहावर मत मांडले.
लिव्ह-इन रिलेशनशिप आणि समलैंगिक विवाह समाजाच्या नियमांच्या विरुद्ध आहेत आणि यामुळे सामाजिक व्यवस्था कोसळू शकते. लिव्ह इन रिलेशनशिप योग्य नाही. हा समाज का टाकलेला आहे? कारण समाजात स्त्री पुरूष प्रमाण व्यवस्थित आहे. जर उद्या स्त्रीयांची संख्या वाढली आणि पुरुषांची संख्या कमी झाली तर तुम्हाला दोन पत्नी विवाह करण्याची परवानगी द्यावी लागेल. असं नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले.
या मुलखातीमध्ये त्यांना भारतात घटस्फोटांवर बंदी यायला हवी का? असा प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर आपली प्रतिक्रिया देत त्यांनी ही भूमिका मंडली.
पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, लिव्ह-इन रिलेशनशिपमुळे समाज व्यवस्था कोसळेल. समाजात काही नियम आहे आणि त्यांचे पालन केले पाहिजे. मी एकदा ब्रिटीश संसदेला भेट दिली होती आणि यूकेचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री यांना त्यांच्या देशासमोरील प्रमुख समस्यांबद्दल विचारले होते. त्यावेळी त्यांनी मला सांगितले की, युरोपीय देशांमधील सर्वात मोठी समस्या ही आहे की पुरुष आणि महिलांना लग्न करण्यात रस नाही.ते लिव्ह इन रिलेशनशिपचा पर्याय निवडत आहे. असं नितीन गडकरी म्हणाले.
आधुनिक अभिमन्यू, ईव्हीएम अन् विरोधक, देवेंद्र फडणवीसांची सभागृहात तुफान फटकेबाजी
तर या मुलाखतीमध्ये त्यांनी समलैंगिक विवाहवर देखील भाष्य केले. यावेळी ते म्हणाले की, समलैंगिक विवाहामुळे सामाजिक व्यवस्थेचे पतन होईल. सर्वेच्च न्यायालयाने 2023 मध्ये समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यास नकार दिला होता. पण राज्यांना केंद्रीय कायदा नसल्यास समलैंगिक विवाह कायदेशीर करणारे कायदे करण्याचा अधिकार असल्याचे आपल्या निर्णयात सांगितले होते.
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा दिलासा, 2100 रुपये मिळणारच, सभागृहात फडणवीसांची ग्वाही