आधुनिक अभिमन्यू, ईव्हीएम अन् विरोधक, देवेंद्र फडणवीसांची सभागृहात तुफान फटकेबाजी

  • Written By: Published:
आधुनिक अभिमन्यू, ईव्हीएम अन् विरोधक, देवेंद्र फडणवीसांची सभागृहात तुफान फटकेबाजी

Devendra Fadnavis: महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सभागृहात बोलताना विरोधकांनवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ईव्हीएमवरून (EVM) तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये विरोधकांनी केलेल्या खोट्या प्रचारावरून देखील सभागृहात बोलताना फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

आज सभागृहात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधकांकडून गेल्या पाच वर्षांत मला आणि माझ्या कुटूंबाला टार्गेट करण्यात आले. राज्यात हा रेकॉर्ड असेल की, सकाळपासून संध्याकाळापर्यंत सहा – सात लोक फक्त माझ्यावर बोलत होते. पण त्यांचे आभार कारण ते माझ्यावर बोलत होते आणि लोकांच्या मनात माझ्याबद्दल सहानभूती निर्माण झाली. जनतेने माझे पाच वर्षाचे काम बघितले होते. मी जात, धर्माचा विचार न करता सर्वांचा काम केले होते. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्यांनी ज्यांनी वेगळं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला, ते उद्ध्वस्त झाले. यावेळी सगळ्यांनी महायुतीला मतदान केले, गेल्या 30 वर्षात 50 टक्के मत कोणाला मिळाली नाही ती महायुतीला मिळाली. मी म्हटलं होतं की, मी आधुनिक अभिमन्यू आहे, मला चक्रव्यूह भेदता येतं, माझ्या चारही बाजूंनी चक्रव्यूह तयार करण्याचा प्रयत्न झाला, पण तो भेदून मी आज या जागेवर उभा आहे. याचं श्रेय माझं नाही, माझ्या पक्षाचं आहे आणि माझ्यासोबत काम करणार्या सहकार्यांचं आहे. असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तर पुढे बोलताना ईव्हीएमवरुन देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात 2012 नंतर व्हीव्हीपॅट निवडणूक होत असून व्हीव्हीपॅट म्हणजे बॅलेट पेपरच आहे. असेही सभागृहात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. लोकसभेनंतर आम्ही विरोधकांच्या फेक नॅरेटिव्ह उध्वस्त करण्याचा काम केला आहे. आता विरोधकांनी खुल्या मनानी जनादेश स्वीकारावा, जनतेने आम्हाला मतदान केलं आणि महायुतीचं सरकार निवडणून आणले असं देखील फडणवीस म्हणाले.

निवडणुकीत जर आपल्या बाजूने निकाल लागला तर लोकशाहीचा विजय आणि दुसऱ्या बाजूने निकाल लागला तर ईव्हीएममध्ये दोष अशी भूमिका विरोधकांची आहे. हा एक प्रकारे लोकशाहीचा खून आहे. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तसेच विरोधक निवडणूक आयोगावर टीका करत आहे मात्र जेव्हा निवडणूक आयोगाने ईव्हीएम हॅक करून दाखवा असा ओपन चॅलेंज दिला होता तेव्हा आठ दिवस एकही विरोधक तिकडे गेला नाही असेही आज सभागृहात विरोधकांवर टीका करत देवेंद्र फडणवीस म्हणाले.

लाडक्या बहिणींना देवाभाऊचा दिलासा, 2100 रुपये मिळणारच, सभागृहात फडणवीसांची ग्वाही

आमच्या लाडक्या बहिणांना योजनचे पैसे याच महिन्यात मिळणार आहे. त्यांना नवीन वर्षाची वाट पाहावी लागणार नाही. असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तसेच महायुतीने सुरु केलेल्या कोणत्याही योजना बंद होणार नाहीत. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube