लाडक्या बहिणींना देवाभाऊचा दिलासा, 2100 रुपये मिळणारच, सभागृहात फडणवीसांची ग्वाही
CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात विधानसभेमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत महायुती सरकारने सुरु केलेली कोणतेही योजना बंद करणार नसल्याची ग्वाही दिली.
लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्या लाडक्या बहिणांना योजनचे पैसे याच महिन्यात मिळणार आहे. त्यांना नवीन वर्षाची वाट पाहावी लागणार नाही. असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तसेच महायुतीने सुरु केलेल्या कोणत्याही योजना बंद होणार नाहीत. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ईव्हीएमवरुन (EVM) विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. राज्यात 2012 नंतर व्हीव्हीपॅट निवडणूक होत असून व्हीव्हीपॅट म्हणजे बॅलेट पेपरच आहे. असेही सभागृहात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आयुष्मान खुराना ब्रँड्सचा आवडता का ? हे आहे कारण
लोकसभेनंतर आम्ही विरोधकांच्या फेक नॅरेटिव्ह उध्वस्त करण्याचा काम केला आहे. आता विरोधकांनी खुल्या मनानी जनादेश स्वीकारावा, जनतेने आम्हाला मतदान केलं आणि महायुतीचं सरकार निवडणून आणले असं देखील फडणवीस म्हणाले. यावेळी मला शरद पवार यांचा आश्चर्य वाटला. त्यांनी यापूर्वी कधीही ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं नाही मात्र यावेळी शरद पवार ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे . त्यामुळे मला त्यांचा आश्चर्य वाटत आहे. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच मतदानावर आक्षेप म्हणजे संविधानाचा अवमान आहे. असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधानावरुन विरोधकांना टोला लावला.
निवडणुकीत जर आपल्या बाजूने निकाल लागला तर लोकशाहीचा विजय आणि दुसऱ्या बाजूने निकाल लागला तर ईव्हीएममध्ये दोष अशी भूमिका विरोधकांची आहे. हा एक प्रकारे लोकशाहीचा खून आहे. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच विरोधक निवडणूक आयोगावर टीका करत आहे मात्र जेव्हा निवडणूक आयोगाने ईव्हीएम हॅक करून दाखवा असा ओपन चॅलेंज दिला होता तेव्हा आठ दिवस एकही विरोधक तिकडे गेला नाही असेही आज सभागृहात विरोधकांवर टीका करत देवेंद्र फडणवीस म्हणाले.