JEE Main 2025 : जीईई मुख्य सत्र 2 चा निकाल राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) ने अधिकृतपणे जाहीर केला आहे. JEE अर्थात जॉइंट एंट्रन्स एग्झामिनेशन मध्ये सहभागी झालेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी ही मोठी बातमी आहे. उमेदवारांना आपले गुण आणि स्कोअरकार्ड पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर शोधावं लागेल.
या तारखांना झाली होती परीक्षा
JEE Main सत्र 2 ची परीक्षा 2, 3, 4, 7, 8 आणि 9 एप्रिल 2025 रोजी आयोजित करण्यात आली होती. देशातील 285 शहरांमधील 531 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा झाली, तसेच भारताबाहेरील 15 शहरांमध्येही परीक्षा केंद्रे ठेवण्यात आली होती.
MPSC Examएमपीएससी पूर्व परीक्षा 2025 ची जाहिरात प्रसिद्ध, 385 जागांसाठी यातारखेला होणार परीक्षा
JEE Mains 2025 मध्ये दोन्ही सत्रांमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी, सत्र 1 आणि 2 मधील सर्वोत्तम स्कोअर (Best of Two) विचारात घेतले गेले. हे स्कोअर एकत्र करून अंतिम मेरिट लिस्ट तयार करण्यात आली आहे. ही मेरिट लिस्ट पुढील टप्प्याच्या प्रवेश प्रक्रियेसाठी – विशेषतः IIT, NIT, IIIT आणि इतर केंद्रीय संस्थांमध्ये प्रवेशासाठी महत्त्वाची ठरणार आहे. JEE Main सत्र 2 चा निकाल लागल्यानंतर आता अनेक विद्यार्थ्यांचे लक्ष आहे ते JEE Advanced 2025 कडे. जे उमेदवार Main मध्ये पात्र ठरले आहेत, ते Advanced साठी अर्ज करू शकतात. यासाठी वेगळ्या अधिसूचनेची अपेक्षा आहे.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या
निकालाव्यतिरिक्त अधिक तपशील, स्कोअरकार्ड डाउनलोड, कट-ऑफ गुण आणि मेरिट लिस्ट संबंधित अपडेट्ससाठी उमेदवारांनी jeemain.nta.nic.in या अधिकृत पोर्टलवर नियमित भेट देणे आवश्यक आहे.
पेपर 1 (B.E./B.Tech) दोन सत्रांत झाला
सकाळी 9 ते 12, दुपारी 3 ते 6
पेपर 2A आणि 2B (B.Arch आणि B.Planning):
सकाळी 9 ते 12.30 या एकाच सत्रात.
निकाल कसा पाहाल? येथे आहे स्टेप बाय स्टेप प्रोसेस
उमेदवार खालील स्टेप्स फॉलो करून आपला निकाल पाहू शकतात:
अधिकृत वेबसाइटवर जा: jeemain.nta.nic.in
“JEE Mains Result 2025 for Session 2” या लिंकवर क्लिक करा
लॉगिन पेज उघडेल, येथे आपले क्रेडेन्शियल्स भरा
‘Submit’ वर क्लिक करा
निकाल स्क्रीनवर दिसेल, तो डाउनलोड करा
भविष्यासाठी प्रिंटआउट घेऊन ठेवा