Download App

Wrestlers Protests : कुस्तीपटूंच्या आंदोलनावर प्रश्न विचारताच महिला केंद्रीय मंत्र्यांनी काढला पळ, व्हिडिओ व्हायरल

The Union Minister ran away asking questions about the wrestlers’ agitation, the video went viral : भाजप खासदार ब्रृजभूषण शरण सिंह (Brijabhushan Sharan Singh) यांच्या विरोधात गेल्या महिन्याभरापासून दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन सुरू आहे. आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी ब्रृजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले. मात्र, अद्यापही ब्रृजभूषण यांच्यावर कोणतीही कारवाई झाली. दरम्यान, आता अनेकजण कुस्तीपटूंच्या समर्थानार्थ उभे राहिले. मात्र, सत्ताधारी भाजपने अद्यापही या आंदोलनाची दखल घेतली नाही. इतकचं नाहीतर भाजप नेते आंदोलनाच्या मुद्यापासून पळ काढत आहेत. असाच केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी (Meenakshi Lekhi) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून लेखी यांचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये लेखी यांनी पत्रकार कुस्तीपटूंच्या आंदोलनाविषयी प्रश्न विचारतात. मात्र, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना लेखी ह्या उत्तर देणं टाळत आहेत. पत्रकारांना टाळण्यासाठी त्या चक्क आपल्या कारकडे धावताना दिसत आहे. कॉंग्रेसने या व्हिडिओविषयी लिहिलं, केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी महिला कुस्तीपटूंच्या मुद्द्यावर तिखट प्रतिक्रिया दिली, तुम्ही खुद्द पाहा, असा टोमणा मारला.

Pooja Sawant : काळ्या साडीतल्या लूकवर खिळल्या नजरा

या व्हिडिओत दिसंत की, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीने लेखी यांनी कुस्तीपटूंच्या आंदोलनाविषयी प्रश्न विचारला की, ‘तुम्ही महिला खासदार आहात, तुम्ही या विषयावर गप्प का आहात? पंतप्रधान गप्प का? तर लेखी यांनी यावर कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही. लेखी ‘चलो चलो चलो…’ म्हणत कारकडे धावतांना दिसत आहेत. प्रश्नांचा भडीमार होत असल्याचं पाहू्न त्यांनी ‘कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे’ एवढंच उत्तर दिलं.

केंद्रीय मंत्री असताना आणि त्याहीपेक्षा एक महिला मंत्री असताना अशा संवेदनशील विषयावर लेखी यांची प्रतिक्रिया पाहून अनेकांनी त्यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत असून नागरिकांनी मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

काँग्रेस नेते आलोक शर्मा यांनी लिहिले की, आज जेव्हा देशातील मुलींच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ आली आहे, तेव्हा भाजपचे खासदार मुलींच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी पळत आहेत. तर @RuchiraC युजर्नसे झोळी घेऊन पळून जाण्याची आता मोदी सरकारची वेळ आली. तर आणखी एकाने लिहिलं की, त्या धावल्या नाहीत, तर ऑलिम्पिकसाठी मॅरेथॉनची तयारी करत आहे, पदक आता लेखी आणि स्मृती इराणीवर अवलंबून आहे, अशा कमेंट करून खिल्ली उडवली.

Tags

follow us