Download App

EVM-VVPAT : निवडणूक प्रकियेत पावित्र्य राखा, व्हेरिफिकेशचा तपशील देण्याचेही ECI ला निर्देश

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : व्हीव्हीपीएटीशी संबंधित प्रकरणावर गुरुवारी (दि.) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी निवडणूक प्रक्रियेत शुद्धता असणे आवश्यक असल्याचे निरीक्षण नोंदवत  ECI वर प्रश्नांची सरबत्ती केली. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी कोणती पावले उचलली याचा तपशीलवार खुलासा करण्यासही न्यायालयाने निवडणूक आयोगाला सांगितले आहे. (SC On EVM-VVPAT case)

Money Laundering Case : ईडीची मोठी कारवाई; राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीची 98 कोटींची मालमत्ता जप्त

निवडणूक प्रक्रियेत पावित्र्य राखण्याचे निर्देश देताना न्यायालयाने निवडणूक आयोगाला ईव्हीएमसह व्हीव्हीपीएटी स्लिप्सच्या क्रॉस-व्हेरिफिकेशनच्या चरणांचे तपशीलवार स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. निवडणूक प्रक्रिया ही एक प्रक्रिया आहे. त्यात पावित्र्य असणे गरजेचे आहे. जे अपेक्षित आहे ते घडत नाहीये अशी भीती कोणालाही नसावी असे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने यावेळी सांगितले. सुनावाणीदरम्यान निवडणूक आयोगाच्या वतीने वकील मनिंदर सिंग न्यायालयात युक्तीवाद केला तर, याचिकाकर्त्यांच्या वतीने वकील निजाम पाशा आणि प्रशांत भूषण यांनी युक्तीवाद केला.

PM Modi Interview : कोणालाही घाबरण्याची गरज नाही, माझे निर्णय घाबरवण्यासाठी नाहीत!

सुनावणीदरम्यान वकील प्रशांत भूषण यांनी VVPAT मशिनमध्ये पारदर्शकता आणण्याची मागणी केली. तर, आता होणाऱ्या निवडणुका निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी न्यायालयाने काही अंतरिम आदेश द्यावेत तसेच उर्वरित मुद्द्यांवर नंतर सुनावणी घ्यावी अशी मागणी अधिवक्ता संजय हेगडे यांनी न्यायालयाला केली. तर, यावेळी न्यायालयात आयोगाकडून VVPAT कसे काम करते याबद्दल माहिती दिली. तसेच ईव्हीएममध्ये छेडछाड करणे शक्य नसल्याचेही सांगितले.

‘न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जातोय’; 21 निवृत्त न्यायाधीशांचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांना पत्र

आयोगाकडे किती VVPAT मशीन्स?

सुनावणीवेळी न्यायालयाने आयोगाकडे किती VVPAT मशीन्स आहेत असा प्रश्न विचारला. त्यावेळी आयोगाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आयोगाकडे सध्या स्थितीला 17 लाख VVPAT असल्याचे सांगितले. यावर न्यायाधीशांनी प्रश्न केला की, मग ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटीची संख्या वेगळी का? यासह अनेक प्रश्न उपस्थित केले. या सर्वांवर अधिकाऱ्याने समाधानकारक उत्तरे दिली. त्यांनी सांगितले की, डेटाबद्दल जाणून घेणे किंवा त्यात छेडछाड करणे शक्य नाही. अधिकाऱ्याने असेही सांगितले की मॉक पोलमध्ये उमेदवार त्यांच्या इच्छेनुसार कोणत्याही मशीनची चाचणी घेऊ शकतात. यावेळीमशीन्स 100% मॉक पोलमधून जात असल्याचेही सांगितले. त्यावर मतदानापूर्वी गोळा केलेल्या स्वाक्षऱ्या आणि प्रत्यक्ष मतांमध्ये काय फरक आहे, अशी विचारणा केली. त्यावर यात कोणताही फरक नसल्याचे सांगत ही भीती टाळण्यासाठी मतदारांना VVPAT पाहण्याची सुविधा देण्यात आली होती असे सांगितले.

follow us