राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमांमध्ये मोठे बदल; वीस किलोमीटरपर्यंत चालवा फ्री गाडी, ‘या’ अटी लागू

राष्ट्रीय महामार्ग सुधारणा नियम २०२४ या नावाने ओळखला जाईल. या नियमांतर्गत राष्ट्रीय महमार्गांवर सुरुवातीचे २० किलोमीटर शून्य शुल्क असेल.

राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमांमध्ये मोठे बदल; वीस किलोमीटरपर्यंत चालवा फ्री गाडी, 'या' अटी लागू

राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमांमध्ये मोठे बदल; वीस किलोमीटरपर्यंत चालवा फ्री गाडी, 'या' अटी लागू

Road and Highway Tolls : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. नवीन नियम, राष्ट्रीय महामार्ग सुधारणा नियम २०२४ या नावाने ओळखला जाईल. या नियमांतर्गत राष्ट्रीय महमार्गांवर सुरुवातीचे २० किलोमीटर शून्य शुल्क धोरण लागू करण्यात आलेलं आहे.

Onion Rate : बळीराजाला दिलासा! किरकोळ बाजारात कांद्याचा दर पोहोचला 80 रुपये किलोवर

यापूर्वी जुलै महिन्यात रस्ते मंत्रालयाने FASTag सोबतच प्रायोगित तत्त्वावर ग्लोबल नेव्हिगेशन सिस्टम (GNSS) नुसार टोल संकलन प्रणाली लागू करण्याची घोषणा केली होती. नवीन नियमांनुसार २० किलोमीटरपर्यंत मोफत प्रवास करायचा असल्यास GNSS चा अवलंब करावा लागणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग, स्थायी पूल, बायपास रस्ता, बोगद्यातील रस्ता.. या मार्गावरील सुरुवातीचे २० किलोमीटर मोफत प्रवास करता येणार आहे. राष्ट्रीय परमिट असलेल्या वाहनांना या नियमांनुसार लाभ घेता येणार नाही.

वाहनाने २० किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास केला तर वाहनधारकांकडून पुढच्या वीस किलोमीटरप्रमाणे फीस वसूल केली जाईल. या बदलांचा उद्देश हा जवळच्या प्रवासासाठी चालकांचा बोझा कमी करण्यासाठी आहे. लांबच्या प्रवासासाठी योग्य ते शुल्क आकारले जाणार आहेत.

दुष्काळ-अतिवृष्टी झळा! भारतात ७.२ टक्क्यांनी शेतकरी आत्महत्या वाढल्या; महाराष्ट्राची स्थिती काय?

मंत्रालयाकडून काढण्यात आलेल्या आदेशामध्ये म्हटलंय की, ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टम आधारित शुल्क प्रणालीनुसार जे चालक, मालक किंवा वाहनाचा प्रभारी व्यक्ती राष्ट्रीय परमिटशिवाय त्याच भागात प्रवास करत असेल तर त्याला संबंधित दिशेला २० किलोमीटरपर्यंतचा प्रवास मोफत असेल. जर प्रवास २० किलोमीटरपेक्षा जास्त झाला तर केवळ योग्य त्या प्रवासाच्या अंतराप्रमाणे पैसे कपात होतील.

Exit mobile version