भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात बंपर भरती, सहा लाखांपर्यंत मिळणार पगार…

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात बंपर भरती, सहा लाखांपर्यंत मिळणार पगार…

NHAI Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, नुकतीच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 38 पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. दरम्यान, या नोकरीसाठी अर्ज पाठवण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय? अर्ज करण्याची शेवटची तारीख काय? याच विषयी जाणून घेऊ.

भारत इंग्लंड सामना रद्द झाला तर फायनलमध्ये कोण? ‘या’ संघाची एन्ट्री पक्की.. 

एकूण जागा – 38

पदांचा तपशील
प्रिन्सिपल डीपीआर तज्ज्ञ पदासाठी एकूण पाच रिक्त पदांची भरती केली जाईल.

वरिष्ठ महामार्ग तज्ज्ञ या पदासाठी एकूण पाच रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.

वाहतूक तज्ज्ञ या पदासाठी एकूण पाच रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.

पर्यावरण/वन तज्ज्ञ या पदासाठी एकूण पाच रिक्त पदांवर भरती केली जाईल.

भूसंपादन तज्ज्ञ या पदासाठी एकूण पाच रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे.

भूतंत्र तज्ज्ञ या पदासाठी एकूण पाच रिक्त पदांवर भरती केली जाईल.

पूल तज्ज्ञ या पदासाठी एकूण दोन रिक्त पदांवर भरती केली जाईल.

टनेल तज्ज्ञ या पदासाठी एकूण एक जागा भरली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता
वरील सर्व पदांसाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती अधिसूचनेमध्ये सविस्त दिली आहे. प्रत्येक पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता काय आहे, हे समजून घेण्यासाठी उमेदवारांनी काळजीपूर्वक अधिसूचना वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.

Shekhar Kapoor कडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत, म्हणाले दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर… 

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अधिकृत वेबसाईट लिंक –
https://nhai.gov.in/#/

पगार
प्रिन्सिपल डीपीआर तज्ज्ञ – 6लाख

वरिष्ठ महामार्ग तज्ज्ञ – 4.50 लाख

वाहतूक तज्ज्ञ – 2.50 लाख
पर्यावरण/वन तज्ज्ञ – 2.30 लाख भूसंपादन तज्ज्ञ – 2.30 लाख
भूतंत्र तज्ज्ञ – 2.30 लाख
पूल तज्ज्ञ – 5.50 लाख
टनेल तज्ज्ञ – 5.50 लाख

अधिसूचना-
1.https://nhai.gov.in/nhai/sites/default/files/vacancy_files/DPR_Expert_Recruitment_notice_Revised.pdf

2.https://nhai.gov.in/nhai/sites/default/files/vacancy_files/Advertisement_DPR.pdf

अर्ज आणि अर्ज प्रक्रिया

उमेदवारांना वरीलपैकी कोणत्याही पदासाठी नोकरीचे अर्ज पाठवायचे असतील तर त्यांना ते ऑनलाइन पद्धतीने पाठवावे लागतील. अर्ज पाठवण्यासाठी उमेदवारांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या लिंकचा वापर करावा. या नोकरीसाठी वयोमर्यादा 56 वर्षे आहे. नोकरीसाठी अर्ज भरताना उमेदवारांनी अर्जात त्यांची संपूर्ण आणि अचूक माहिती भरावी. तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत.

निवडलेल्या उमेदवारांना प्रवास भत्ता/महागाई भत्ता (TA/DA) प्रदान केला जाणार नाही.
निवडलेल्या उमेदवारांना सर्व कामकाजाच्या दिवशी कार्यालयात हजर राहावे लागेल किंवा क्षेत्र भेट द्यावी लागेल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube