Kathua Encounter in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या कठुआ (Encounter) जिल्ह्यात दहशतवाद्यांविरोधात चाललेल्या चकमकीत तीन जवान शहीद झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या चकमकीदरम्यान, डीएसपीसह सात पोलीस जखमी झाले, ज्यांवर उपचार सुरू आहेत. यादरम्यान, सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांनाही ठार मारले आहे.
सुरक्षा दलाची मोठी कारवाई; काश्मिरातील चकमकीत दोन अतिरेक्यांचा खात्मा
काल गुरुवार सकाळी ही चकमक सुरू झाली होती. जम्मू आणि काश्मीर पोलिसांकडून घुसखोरी केलेल्या दहशतवाद्यांच्या गटाविरुद्ध सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान अचानक गोळीबार झाला. दहशतवादी जंगलात लपले होते आणि त्यांनी त्यांच्या दिशेने येणाऱ्या सुरक्षा दलांवर हल्ला केला.
राजबागच्या घाटी जुठाणा भागातील जाखोले गावाजवळ झालेल्या या चकमकीत ६ दहशतवादी सहभागी असल्याचा संशय आहे. हे दहशतवादी पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद (जेईएम) संघटनेचे सदस्य असल्याचं सांगितलं जात आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी आतापर्यंत पोलिसांच्या मृत्यूची पुष्टी किंवा खंडन केलेले नाही. विभागाचे म्हणणं आहे की आज शुक्रवार हे चित्र स्पष्ट होईल.