Download App

न्यायमूर्ती यशवंत वर्मा प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! तीन न्यायाधिशांवर सोपवली जबाबदारी

Yashwant Varma प्रकरणावर मात्र आता देशाच्या सरन्यायाधीशांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. असे इतिहासात पहिल्यांदाच होणार आहे.

Three-judge panel probe Delhi HC Justice Yashwant Varma amid ‘cash at home’ charge: दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली. त्यानंतर त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यामुळं हे न्यायाधीश साहेब चर्चेत आलेत. हे प्रकरणावर मात्र आता देशाच्या सरन्यायाधीशांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या न्यायाधीशांच्या चौकशीसाठी तीन सदस्य समिती नेमण्यात आली आहे. ज्यामध्ये तीनही सदस्य हे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. तसेच या प्रकरणात समोर येणाऱ्या सर्व नोंदी या सार्वजनिक केल्या जाणार आहेत. असे इतिहासात पहिल्यांदाच होणार आहे.

गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे धोकादायक? होवू शकतात गंभीर आजार…

या समितीकडून वर्मा यांच्या घरात सापडलेल्या रोख रकमेवर चौकशी आणि तपास केला जाणार आहे. ही रोख रक्कम कुठून आली? तिचा स्त्रोत काय? यावर येणारा दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचा अहवाल सार्वजनिक केला जाणार आहे. त्याचबरोबर न्यायमूर्ती वर्मा यांचे उत्तर देखील सार्वजनिक केले जाणार आहे. तसेच एका वेबसाईटवर कागदपत्र देखील उपलब्ध करून दिली जातील. सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर ही कागदपत्रे अपलोड केली जात आहेत. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी हा निर्णय घेण्याचे कारण म्हणजे न्यायपालिकेची बाजू सर्वांसमोर मांडण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात सर्वप्रथमच अशा प्रकारे नोंदी सार्वजनिक केल्या जाणार आहेत.

नेमकं प्रकरण काय?

दिल्ली उच्च न्यायालयाच्या (Delhi High Court) एका न्यायाधीशांच्या घरात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली. त्यानंतर त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यामुळं हे न्यायाधीश साहेब चर्चेत आलेत. हे प्रकरण (Delhi High Court Judge) आहे, दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या (Yashwant Verma) संदर्भातील. अलीकडेच दिल्लीतील त्यांच्या सरकारी बंगल्यात आग लागली होती.

रिया चक्रवर्तीला क्लिनचीट! सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूबाबत सीआयडीचा क्लोजर रिपोर्ट, आत्महत्या…

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, आगीची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या पथकाला आग विझवताना त्याच्या बंगल्यात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळली. बंगल्यात एवढी मोठी रक्कम पाहून कर्मचारी थक्क झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती दिली. मात्र, जेव्हा हे प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले, तेव्हा एकच गोंधळ उडाला.

follow us