Download App

Video : सात मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली; तिघांचा मृत्यू, १७ जण अडकले, थरारक व्हिडिओ समोर

ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. बंगळुरूच्या बाबुसापल्या परिसरात मंगळवारी मुसळधार पावसामुळे एक निर्माणाधीन इमारत कोसळून दुर्घटना घडली.

  • Written By: Last Updated:

Bengaluru building collapsed : बंगळुरूमध्ये सात मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली. (collapsed) काही क्षणांत होत्याचं नव्हतं झालं. ही इमारत निर्माणाधीन असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दुर्घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून 17 जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि आपात्कालीन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. बंगळुरूच्या बाबुसापल्या परिसरात मंगळवारी मुसळधार पावसामुळे एक निर्माणाधीन इमारत कोसळून दुर्घटना घडली. यामध्ये तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. बंगळुरूमध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलं असताना ही धक्कादायक घटना घडल्याचं सांगितलं. ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे. बचावकार्यात पावसामुळे अडथळा येत आहे असंही ते म्हणाले.

शिवसेनेची 45 नावांची पहिली यादी जाहीर; बंडात साथ दिलेल्या सर्वांना CM शिंदेंकडून उमेदवारी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे 17 कामगार अडकल्याची भीती आहे. जखमी कामगारांपैकी एकाने ढिगाऱ्याखालून बाहेर पडून लोकांना घटनेची माहिती दिली. पोलीस उपायुक्त (पूर्व बंगळुरू) डी. देवराज यांनी दिलेल्या माहितीनुसार 13 जणांना बाहेर काढण्यात यश आलं. अद्याप पाच जण बेपत्ता आहेत. ही इमारत सात मजली होती. ती नेमकी कशामुळे कोसळली याचा तपास आणि चौकशी केली जाणार आहे.

फक्त काही सेकंदात पत्त्यासारखी ही इमारत कोसळली. याचा सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आला आहे. हा व्हिडीओ काळजात धडकी भरवणारा आहे. 9 सेकंदात संपूर्ण इमारत जमीनदोस्त झाली आहे. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने ही दुर्घटना घडली का याचाही तपास केला जाणार आहे.

follow us

संबंधित बातम्या