बेळगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. (Cold) बेळगावातील अमन नगर भागात आज मंगळवार, (दि. 18 नोव्हेंबर)रोजी सायंकाळी थंडीपासून बचाव करण्यासाठी बंद खोलीत कोळशाची शेगडी लावून झोप घेतलेल्या चार तरुणांपैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
पुणे ते शिरूर अन् अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर रस्ता तातडीने दुरुस्ती करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
रेहान माटे (वय 22), मोईन नालबंद (वय 23), सर्फराज हरपनहळ्ळी (वय 22) अशी मृतांची नावे आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. गंभीर अवस्थेतील युवकाचे नाव शाहनवाज हरपनहळ्ळी (वय 19) आहे. त्याच्यावर बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, शेगडीमधून बाहेर पडणाऱ्या कार्बन मोनोऑक्साईड वायूमुळे ऑक्सिजनचा अभाव निर्माण झाला आणि सर्वजण झोपेतच गुदमरले. घटनेची माहिती मिळताच बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेट, अमन सेट, पोलीस निरीक्षक बी. आर. गडेकर आणि आपत्कालीन बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही अत्यंत वेदनादायक घटना असून अमननगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
