Download App

किंडल अन् टिंडरमध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती गोंधळले; अचानक बदललं कोर्टरूमचं धीरगंभीर वातावरण

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात अनेक घटनांमध्ये न्याय मिळावा यासाठी करोडो प्रकरणे येत असतात. यात काही प्रकरणांमध्ये दिलेला निकाल हा विचार करायला लावणारा असतो. मात्र, सुप्रीम कोर्टातील एका सुनावणीदरम्यान एक रंजक किस्सा समोर आला आहे. ही सुनावणी ग्रामीण भागात ग्रंथालय बांधण्याबाबत याचिकेवरील होते. परंतु, सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींचा किंडल (Kindle) आणि टिंडरमध्ये (Tinder) गोंधळ झाला अन् अचानक कोर्टरूममधील वातावरण क्षणार्धात बदलेले. नेमकं सुनावणीदरम्यान काय गोंधळ झाला हे आपण जाणून घेऊया. (Supreme Court Judge Confuses In Tinder & Kindle e-book)

सीबीएसईच्या पुस्तकात डेंटिंग, रोमान्सचे धडे…; 9 वीचे पुस्तक सोशल मीडियावर व्हायरल

ग्रंथालयाबाबत दाखल याचिकेवर सुरू होती सुनावणी

भारतातील ग्रामीण भागांमध्ये ग्रंथालये बांधावे यासाठी सुप्रीम कोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती पीव्ही संजय कुमार आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस सुनावणी करत होते. सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी ग्रामीण भागात ग्रंथालये बांधण्यासाठी सरकार काय करत आहे? अशी विचारणा केली. त्यावर सरकार ग्रामीण भागातील ग्रंथालयांवर काम करत असून त्यांच्या डिजिटलायझेशनवरही काम केले जात असल्याचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल विक्रमजीत बॅनर्जी यांनी सांगितले.

मोठी बातमी : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना ‘भारतरत्न’ जाहीर; PM मोदींनी केली घोषणा

ही माहिती ऐकल्यानंतर न्यायमूर्ती संजय कुमार यांनी “लायब्ररीत बसून पानं उलटवण्यात जी मजा आहे, ती डिजिटलमध्ये कुठे आहे? असा प्रतिप्रश्न करत तुम्ही याला काय म्हणता? टिंडर असे विचारले. न्यायमूर्तीच्या या प्रश्नानंतर कोर्टरूममधील वातावरण अचानक बदलेले आणि उपस्थित लोकांमध्ये एकच हशा पिकला.

अर्थसंकल्पीय भाषणात सीतारामन यांनी 35 वेळा पॉलिसी, 26 वेळा भारत अन् 42 वेळा उच्चारलं मोदी

त्यानंतर बॅनर्जी यांनी डिजिटल स्वरूपात वाचले जाणारे टिंडर नसून किंडल आहे असे अधोरेखित करत त्यांची चूक लक्षात आणून दिली. यावर न्यायमूर्ती संजय कुमार यांनी हसत होय टिंडर हे डेटिंग ॲप असल्याचे मान्य केले. मात्र, ग्रंथालयाच्या सुनावणीदरम्यान किंडलऐवजी टिंडरचा उल्लेख आल्याने कोर्टरूममधील धीरगंभीर वातावरण अचानक बदलले आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकल्याचे पाहण्यास मिळाले. आपण उच्चारलेला शब्द चूकीचा असून टिंडर हे डेटिंग अॅप असल्याचे न्यायमूर्तींनीदेखील मान्य करत दाखल याचिकेवर पुढील सुनावणी सुरू केली.

follow us