tourists boat Accident in Kerala : केरळमध्ये भीषण दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. केरळमधील मलप्पुरममध्ये पर्यटकांची नाव उलटून 21 जणांचा मृत्यू झाल्याची भयावह दुर्घटना घडली आहे. या घटनेमुळे देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी रात्री ही दुर्घटना घडली. या बोटीमध्ये 40 प्रवाशी प्रवास करत होते. यापैकी तब्बल 21 जणांची मृत्यू झाला आहे.
यापैकी काहीजण अद्याप देखील बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांची आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्या या घटनेची माहिती मिळताच बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्या सुरू केले आहे.
या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्याचबरोबर त्यांनी या घटनेतील मृतांच्या नातेवाईकाला प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली. दरम्यान केरळ दुर्घटनेची माहिती मिळताच राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी रात्रीच तातडीने आपत्कालीन बैठक बोलावली. अधिकाऱ्यांना तातडीने जखमींवर उपचार करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले आहेत.
दुसरीकडे केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजनय यांनीही शोक व्यक्त केला आहे. त्यांनी देखील अधिकाऱ्यांना तातडीने जखमींवर उपचार करण्याचे आदेश दिले आहेत.