Download App

त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचा ‘या’ दिवशी शपथविधी पार पडणार

नवी दिल्ली : त्रिपुरामध्ये नव्या सरकारचा शपथविधी सोहळा 8 मार्च रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) देखील शपथविधी सोहळ्याला पोहोचणार आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली. नुकत्याच पार पडलेल्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजपने एकूण 60 पैकी 32 जागा जिंकल्या, तर त्याचा मित्रपक्ष आयपीएफटीने एक जागा जिंकली.

त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजपने एकूण 60 पैकी 32 जागा जिंकल्या आहेत, तर त्यांचा मित्रपक्ष आयपीएफटीने एक जागा जिंकली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा रविवारी (5 मार्च) दिल्लीला पोहोचणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. येथे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत त्रिपुरासह नागालँड आणि मेघालयच्या शपथविधी सोहळ्याबाबत चर्चा होऊ शकते.

डोळ्यांखालील काळी वर्तुळे होतील दूर… जाणून घ्या उपाय

त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी शुक्रवारी (3 मार्च) आपल्या सरकारचा राजीनामा राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांच्याकडे सुपूर्द केला. त्यांनी पत्रकारांना सांगितले की नवीन सरकार 8 मार्च रोजी शपथ घेणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. नव्या सरकारचा शपथविधी सोहळा येथील विवेकानंद मैदानावर होणार आहे. शपथविधी सोहळ्याला भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेत्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे.

पोस्टर वॉर! कसबा एक झाकी है, कोथरूड नागपूर बाकी है…

निवडणुकीचे निकाल…
त्रिपुरामध्ये भाजपने 33 जागा जिंकल्या आहेत. सीपीआय-काँग्रेस आघाडीला 14 जागा मिळाल्या. तर टिपरा मोथा पक्षाने 13 जागा जिंकल्या. नागालँडमध्ये NDPP आणि भाजप युतीने 37 जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला 7, जेडीयू 1, एलजेपी 2, एनपीपी 5 जागा जिंकण्यात यश आले आहे.

Tags

follow us