Download App

Twitter Down Today : जगभरातील युजर्सना लॉग इन करताना अडचणी

Twitter Down Today : ट्विटर, ही मायक्रो ब्लॉगिंग साईट डाऊन (Twitter Down) झाल्यामुळे जगभरात युजर्सना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. ट्विटर हा आघाडीचा सोशल मीडिया मोठा प्लॅटफॉर्म आहे. जगभरात लाखो युजर्स या प्लॅटफॉर्मचा वापर करतात. ट्विटर डाऊन (Twitter Down Around the World) झाल्यामुळे जगभरामधील युजर्स त्यांचे ट्विटर खाते लॉग इन करु शकले नाहीत. यामुळे त्यांना ट्विट करता अथवा बघता आले नाही.

एलन मस्क (Elon Musk) यांच्याकडे ट्विटरची मालकी आल्याने कर्मचारी कपात मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. ट्विटरने जसजशी कर्मचारी कपात करण्यास सुरवात केली आहे. तसतसे ट्विटर डाऊन होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. सोशल मीडियाविषयी माहिती ठेवणारी आणि त्यांच्या घडामोडींची अद्ययावत माहिती देणाऱ्या डाउन डिटेक्टरने दिलेल्या माहितीनुसार, साधारण दुपारी ३ वाजून ४७ मिनिटांनी ट्विटर डाऊन झाले होते.

IND vs AUS : इंदूरची खेळपट्टी बनली भारतीय फलंदाजांसाठी कोडे, चाहत्यांनी Twitter वर उडवली खिल्ली

ट्विटर एकट्या भारत देशातच नव्हे तर युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम, जपान आणि जगभरात अनेक देशांतील वापरकर्त्यांकडून ट्विटर डाऊन असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. प्रामुख्याने अ‍ॅपच्या तुलनेमध्ये डेस्कटॉप आणि मोबाइल आवृत्त्यांवर परिणाम करणारी समस्या व्यापक असल्याचे दिसून आले आहे. ट्वटिर डाऊन झाल्याची माहिती पुढे येताच अनेक वापरकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर ट्विटरची मोठी खिल्ली उडवणारी आणि चिमटे काढणारे अनेक मिम्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

 

Tags

follow us