Twitter यूजर्ससाठी मोठा धक्का! या व्हेरिफाइड खात्यांचे ब्लू टीक जाणार

Twitter Blue Tick Subscription : मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने युजर्सना पुन्हा एकदा मोठा झटका दिला. 1 एप्रिलपासून सशुल्क सबस्क्रिप्शन नसणाऱ्या ट्विटर वापरकर्त्यांच्या खात्यावरून ब्लू टिक हटवण्यास सुरुवात करणार आहे. ट्विटरकडून नवीन सूचनेच परिपत्रक जारी करण्यात येणार आहे. यानुसार, अनपेड ट्विटर खात्यांचे ब्लू टिक सबस्क्रिप्शन हटवण्यात येणार आहे. या ट्विटर युजर्सचे खाते ब्लू टिक पेट सबस्क्रिप्शनचं असणार […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (94)

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (94)

Twitter Blue Tick Subscription : मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने युजर्सना पुन्हा एकदा मोठा झटका दिला. 1 एप्रिलपासून सशुल्क सबस्क्रिप्शन नसणाऱ्या ट्विटर वापरकर्त्यांच्या खात्यावरून ब्लू टिक हटवण्यास सुरुवात करणार आहे. ट्विटरकडून नवीन सूचनेच परिपत्रक जारी करण्यात येणार आहे. यानुसार, अनपेड ट्विटर खात्यांचे ब्लू टिक सबस्क्रिप्शन हटवण्यात येणार आहे.

या ट्विटर युजर्सचे खाते ब्लू टिक पेट सबस्क्रिप्शनचं असणार आहे, फक्त त्याच खात्यांचे ब्लू टिक कायम ठेवण्यात येणार आहे. बाकीच्या सर्व खात्याचे ब्लू टिक हटवण्यात येणार आहे. 1 एप्रिलपासून ट्विटरकडून हे नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत. भारतात ट्विटरच्या ब्लू टिककरिता ९०० रुपये प्रति महिना शुल्क भरावा लागणार आहे.

या खात्याचे ब्लू टिक हटवणार

ट्विटरचे ( Twitter ) मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरवरील ब्लू टिक सब्सक्रिप्शनचा (Twitter Blue Subscription) निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा मोठा निर्णय घेतला. आता फक्त पेड सबस्क्रिप्शन विकत घेतलेल्या युजर्सनाचं ट्विटरची ब्लू टिक असणार आहे. गेल्या काही महिन्यांअगोदर ट्विटरने ब्लू टिक सब्सक्रिप्शनचा नवा पर्याय आणला होता.

मात्र, त्याअगोदरच ब्लू टिक मिळालेल्या म्हणजे जुन्या व्हेरिफाईट युजर्सची ब्लू टिक हटवले गेले नव्हते. आता कंपनीने अगोदर दिलेल्या ब्लू टिक हटवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पेड सबस्क्रिप्शन नसलेल्यांना ब्लू टिक मिळणार नाही. जगात सर्वात श्रीमंत असलेला व्यक्ती एलॉन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर कंपनी विकत घेतल्यापासून त्यांनी ट्विटरमध्ये अनेक मोठे बदल केले आहेत.

देशातील 1.2 कोटी WhatsApp यूजर्स अन् 17 लाख फेसबूक यूजर्सचा डेटा लीक

ट्विटरवर असलेल्या बनावट खात्याना आळा घालण्याकरिता एलॉन मस्क यांच्याकडून प्रयत्न सुरु आहेत. यामुळे तुम्ही अद्याप ट्विटर ब्लू (Twitter Blue) चं सबस्क्रिप्शन घेतलं नसणार आहे,परंतु 1 एप्रिल नंतर तुमच्या अकाऊंटवर फ्री ब्लू टिक हटवण्यात येणार आहे.

यासाठी देखील मोजावे लागणार पैसे

आता ट्विटरप्रमाणे फेसबूक व इंस्टाग्रामवर ब्ल्यू टीकसाठी देखील तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी देखील ही घोषणा केली. याअगोदर एलन मस्क यांनी ट्विटरवर ब्लू टिक सबस्क्रिप्शन लाँच करून पैसे वसूल करण्यास सुरुवात केली. यासाठी सुमारे ९०० रुपये मोजावे लागणार आहेत.

Exit mobile version