देशातील 1.2 कोटी WhatsApp यूजर्स अन् 17 लाख फेसबूक यूजर्सचा डेटा लीक
आत्तापर्यंतचे सर्वात मोठे सोशल मीडिया डेटा लीकचे प्रकरण समोर आले आहे. यामध्ये 7 लोकांना अटक करण्यात आली आहे. सायबर पोलिसांच्या माहितीमुसार यामध्ये सरकारी व गैरसरकारी अशा 16.8 कोटी अकाउंटचा डेटा चोरीला गेला आहे. यामध्ये 2.55 लाख सैन्याच्या अधिकाऱ्यांच्या डेटा देखील समावेश आहे. आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी डेटा चोरी मानली जात आहे.
या सर्व गँगला तेलंगणाच्या साइबराबादच्या पोलिसांनी पकडले आहे. हे सर्व लोक 140 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डेटा विकत होते. यामध्ये देशातील सैनिकांचा डेटाच्या व्यतिरिक्त अन्य लोकांचे फोन नंबर तसेच नीटच्या विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहितीचा समावेश आहे. या घटनेची माहिती साइबराबादचे पोलिस आयुक्त एम स्टीफन रवींद्र यांनी दिली आहे.
Amritpal Singh Location : अमृतपाल नेमका कुठं? विविध प्रकारच्या माहितीमुळे पोलिसांची दमछाक
याप्रकरणामध्ये सात डेटा ब्रोकर्सना दिल्ली मधून अटक करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी नोएडाच्या कॉल सेंटरमधून डेटा एकत्र करत होते. या चोरीला केलेल्या डेटाला 100 सायबर चोरांना विकल्याचे या आरोपींनी कबुल केले आहे. या डेटा लीकमध्ये 1.2 कोटी व्हॉट्सअॅप यूजर्स व 17 लाख फेसबूकच्या यूजर्सच्या डेटाचा समावेश आहे. सैनिकांच्या डेटामध्ये त्यांची सध्याची रँक, ई-मेल आयडी त्यांची पोस्टिंग कुठे आहे या सर्व गोष्टींचा समावेश आहे. या डेटाचा वापर सैन्यावर पाळत ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. पोलिस रिपोर्टच्या अनुसार 50,000 लोकांच्या डेटाला फक्त 2000 रुपयांमध्ये विकले आहे.
Pakistan : काश्मीरवर बोलले, पाकिस्तानींना भर कार्यक्रमातून हाकलले; अमेरिकेतील प्रकार..
यापूर्वी नोव्हेंबर 2022 मध्ये भारत, अमेरिका, सौदी अरेबिया आणि इजिप्तसह 84देशांतील व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांचा डेटा लीक झाला होता आणि हा डेटा ऑनलाइन विकला गेला होता. जगभरातील सुमारे487 दशलक्ष व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांचा डेटा हॅक करण्यात आला. हॅक केलेल्या डेटामध्ये 84 देशांतील व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांचे मोबाइल नंबर देखील समाविष्ट होते, त्यापैकी 61.62 लाख फोन नंबर भारतीयांचे होते.