Types Of Short Term Loan : महागाईच्या काळात अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण विविध प्रकारचे कर्ज घेत असतात. घेण्यात येणारे हे कर्ज बहुतांशवेळी अल्प मुदतीसाठी घेतली जातात. आज सर्वच बँका अशाप्रकारचे अल्प मुदतीच्या कर्जाचे वाटप करतात. अल्पावधीत घेतलेले कर्ज आपत्कालीन परिस्थितीत खूप उपयुक्त ठरू शकते. मात्र, कर्जदाराला यावर अधिक व्याज आणि विविध प्रकारचे शुल्क भरावे लागू शकते.
गद्दार सत्तार हाय हाय… विधानभवनाच्या पायर्यांवर विरोधकांची घोषणाबाजी
आज आपण शॉर्ट टर्म लोन किती प्रकारचे असतात आणि कुठल्या लोनचं काय फायदे आहेत याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत.
शॉर्ट टर्म लोन हे असुरक्षित कर्जाच्या श्रेणीत येते आणि याची परतफेड करण्याचा कालावधी सहा महिने ते एक वर्षांपर्यंतचा असतो. अशा प्रकारचे कर्ज बँकांकडून त्वरित मंजूर केले जाते.
काय असते शॉर्ट टर्म लोन?
शॉर्ट लोनचा अर्थ वैयक्तिक कर्जासारखे घेतलेले कर्ज असा होय. क्रेडिट कार्डवर घेतलेले कर्ज, ओव्हरड्राफ्ट आणि ब्रिज लोन इत्यादी शॉर्ट टर्मच्या श्रेणीत येतात. याशिवाय नागरिकांना शॉर्ट टर्म लोनदेखील दिले जाते. हे कर्ज कमी क्रेडिट स्कोअर असलेल्यांना दिले जाते. यासाठी कर्जदाराला आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड यापैकी एक पुरावा द्यावेा लागतो. तसेच कर्ज देण्यापूर्वी बँक अर्जदाराकडे आयटीआर किंवा फॉर्म 16 देखील मागतात. एकूणच सध्याच्या पगाराचा अंदाज यावरून बांधला जातो आणि त्याच आधारावर कर्ज दिले जाते.
ठाण्यात गुंडांना सरकारचं अभय; आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना ललकारलं
ब्रिज लोन म्हणजे काय?
हे देखील एकप्रकारे अल्प मुदतीचे कर्ज आहे. जर तुम्ही घर खरेदी करत असाल आणि तुमच्याकडे पुरेसे पैसे उपलब्ध नसतील, तर तुम्ही ब्रिज लोनसाठी अर्ज करू शकता. विशेषत: जेव्हा तुम्हाला जुने घर विकून नवीन मालमत्ता खरेदी करायची असेल, तेव्हा हे कर्ज तुमच्यासाठी अधिक उपयुक्त ठरते. हे कर्ज 12 ते 18 महिन्यांच्या कालावधीसाठी दिले जाते. या कर्जाअंतर्गत अर्जदाराच्या उत्पन्नाच्या आधारे बँका मालमत्तेच्या 70 टक्के रक्कम देतात. अशा कर्जांवर प्रक्रिया शुल्क आकारले जाते आणि मालमत्ता गहाण ठेवावी लागते. दीर्घ मुदतीच्या कर्जाच्या तुलनेत त्याचे व्याज जास्त असते. तसेच काही अटींच्या अधीन राहून दीर्घ मुदतीच्या गृहकर्जात रुपांतर करण्याची परवानगी यात आहे.
क्रेडिट कार्ड लोन
क्रेडिट कार्ड कर्ज हे पूर्व-मंजुरी असलेले कर्ज आहे कार्ड होल्डरच्या अनुमतीनंतर बँका काही दिवसांत हे कर्ज देते. यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नसते. क्रेडिट कार्डच्या आधारावर देण्यात येणारे कर्ज परत करण्यासाठी साधारण एक ते पाच वर्षांचा कालावधी दिला जातो. ही रक्कम कर्जदार मासिक हप्त्यांमध्येही भरू शकतो.