Download App

ठाण्यात गुंडांना सरकारचं अभय; आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना ललकारलं

ठाणे : ठाण्यामध्ये (Thane)सरकारी गुंडांचं राज्य सुरु असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी ट्वीट (Tweet)करत याकडं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांच्यामध्ये कायमच कोणत्या न कोणत्या कारणावरुन आरोप प्रत्यारोप सुरु असतात. त्यातच आता आव्हाडांनी पोलिसांना (Thane Police)लक्ष्य केल्याचं दिसून येतंय. अनेक दिवसांपासून जितेंद्र आव्हाडांचे ठाणे पोलीस प्रशासनासोबत खटके उडत आहेत. ठाण्यात गुन्हेगारी (Crime)वाढत आहे. त्याचबरोबर गुन्हेगारांना सरकारकडून अभय दिलं जात असल्याचा आरोप केला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, ठाण्यामध्ये जानेवारी महिण्यात चार खून आणि 13 खूनांच्या प्रयत्नांचे गुन्हे नोदवले आहेत. एकीकडे पोलीस प्रशासन झोपले आहे का असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. तर दुसरीकडे रस्त्यावर “सरकारी अभय” असणारे गुंड मोकाट फिरत आहेत. त्याचबरोबर या ट्वीटला ठाण्यात_सरकारी_गुंडांचाराज असा हॅशटॅग वापरला आहे.

Telegram App : टेलीग्रामचे युझर्ससाठी नवे फीचर्स, तुम्हीही वापरू शकता

ठाणे पोलिसांकडून सुडाचं आणि द्वेषाचं राजकारण सुरु असल्याचाही आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. हे पोलिसांनी बंद करावं असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे. ठाण्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री नाहीत, ठाण्यात मुख्यमंत्री हेच गृहमंत्री आहेत, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.

आव्हाड यांच्या ट्वीटवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत. त्यावर नागरिक म्हणतात की, ठाणे आता फक्त गुंडांचं शहर म्हणून ओळखलं जाणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या ट्वीटला एका नेटकऱ्यानं म्हटलंय की, सर्व सामान्य जनतेचा नाही राहिला कोणी वाली, पोलीस प्रशासन आहे कोणाचा दबावाखाली? विरोधकांवर गुन्हे दाखल करताना प्रशासन आहे सुसाट. खून, दरोडा, सराईत गुन्हेगार ठाण्यात फिरत आहेत मोकाट. सर्वसामान्य जनता आणि विरोधकांना नका समजू कायर, आमच्या ठाण्यात पण आहे एक जनरल डायर अशा आशयाचं ट्वीट केलं आहे.

Tags

follow us