शेतकरी, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरुन नाना पटोलेंनी सरकारला घेरलं…
मुंबई : राज्यातील शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांंवरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप-शिंदे सरकारला घेरलं आहे. उद्योगपतींच्या कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसा आहे पण शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसाठी पैसा नाही. हे सरकार शेतकऱ्यांसह कर्मचाऱ्यांविरोधात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
अजितदादा, पाच वर्षे मुख्यमंत्री राहिल्यावर मला चांगलचं कळलं; फडणवीसांनी सुनावलं
नाना पटोले म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे सरकार कोणत्याही मुद्द्यांवर केवळ सकारात्मक आहे, असे म्हणून वेळ मारून नेते पण ठोस निर्णय घेत नाही. जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी २० लाख कर्मचारी संपावर गेले आहेत.
जुनी पेन्शन लागू केल्यास आर्थिक बोजा पडेल असे सांगणाऱ्या सरकारकडे मुठभर उद्योगपतींची कोट्यवधींची कर्ज माफ करण्यासाठी पैसा आहे. पण शेतकरी व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पैसा नाही हा सरकारचा ढोंगीपणा असल्याचंही त्यांनी म्हंटलंय. काँग्रेसशासित राजस्थान, हिमाचल प्रदेश व छत्तिसगडमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे.
सुरुवातीलाच विघ्न.. वनडे मालिकेआधी ऑस्ट्रेलियासाठी वाईट बातमी
जे काम काँग्रेसशासित राज्ये करु शकतात तेच काम महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार का करु शकत नाही? सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीवर राज्यातील भाजपाप्रणित सरकारने तोडगा काढावा अन्यथा खुर्ची खाली करावी, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
पुण्यातल्या संतप्त पतीचा कारनामा; घटस्फोटाची नोटीस येताचं जाळल्या गाड्या
तर दुसरीकडे शेतकऱ्यांचा मोर्चा विधानभवनावर मोर्चा येत आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकारने धानाला ३००० रुपये भाव व ६०० रुपये बोनस दिला आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार मात्र ३५० रुपये देत आहे. महाविकास आघाडी सरकार धान उत्पादक शेतकऱ्याला ७०० रुपये बोनस देत होते. भाजपा सरकार फक्त उद्योगपतींचे असल्याचंही ते म्हणाले.
दरम्यान, भाजपा सरकार फक्त उद्योगपतींचे आहे, गरिबांचे, शेतकऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे सरकार नाही. भाजपा सरकारकडे या घटकाला देण्यासाठी पैसा नाही हे दुर्दैवी आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.