सुरुवातीलाच विघ्न.. वनडे मालिकेआधी ऑस्ट्रेलियासाठी वाईट बातमी
IND vs AUS ODI Series : कसोटी सामन्यांची मालिका गमावल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाला आणखी एक झटका बसला आहे. 17 मार्चपासून सुरू होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी (IND vs AUS ODI Series) पेट कमिन्स भारतात येणार नाही. त्यामुळे संघाचे नेतृत्व स्टीव्ह स्मिथकडेच राहिल असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे.
भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान आता एकदिवसीय सामने सुरू होणार आहेत. स्टीव्ह स्मिथकडे (Steve Smith) संघाचे नेतृत्व कायम ठेवण्यात आले आहे. याचे कारण म्हणजे पैट कमिन्स भारतात येणार नाही. संघाचा कप्तान पैट कमिन्स त्याच्या आईच्या देखभालीसाठी दिल्लीतील दुसऱ्या कसोटीनंतर मायदेशी परतला होता. मागील आठवड्यात त्याच्या आईचे निधन झाले. त्यावेळी अहमदाबाद येथे कसोटी मालिकेतील अंतिम सामना सुरू होता.
भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडियाचा नवा विक्रम
संघाचे प्रशिक्षक एंड्र्यू मैकडॉनल्ड म्हणाले, की पैट आता परत येणार नाही. सध्या तो अतिशय कठीण प्रसंगातून जात आहे. सध्या तो त्याच्या कुटुंबाबरोबर आहे.
आता याचा अर्थ असा आहे की दोन कसोटी सामन्यात नेतृत्व केल्यानंतर आता वनडे मालिकेचेही नेतृत्व स्मिथ करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला गेलेला अंतिम कसोटी सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे टीम इंडियाने ही मालिका 2-1 अशा फरकाने खिशात घातली.
भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडियाचा नवा विक्रम
कसोटी मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढला आहे. आता याच आत्मविश्वासाने एकदिवसीय मालिकेसाठी संघ मैदानात उतरेल. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघालाही ही मालिक जिंकण्याच्या इराद्याने उतरावे लागेल. त्यामुळे या मालिकेतील लढती चुरशीच्या होतील अशी चिन्हे आताच दिसत आहेत. येत्या 17 मार्चपासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होत आहे.