Download App

काँग्रेसला धक्का! दिल्लीत उद्धव ठाकरेंचा ‘आप’ला पाठिंबा; इंडिया आघाडीला तडे?

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीला पाठिंबा दिला आहे.

Delhi Assembly Elections 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल (Delhi Assembly Elections 2025) वाजलं आहे. 5 फेब्रुवारीला मतदान तर 8 तारखेला निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पार्टीसमोर भाजप आणि काँग्रेसचं आव्हान आहे. यंदा अरविंद केजरीवाल यांच्यासाठी (Arvind Kejriwal) निवडणूक थोडी कठीण असल्याचं सांगितलं जात आहे. याची जाणीव केजरीवाल यांनाही आहे त्यामुळे त्यांच्याकडून एक एक पाऊल अतिशय काळजीपूर्वक टाकले जात आहे. त्यातच विरोधी पक्षांची साथ त्यांना मिळू लागली आहे.

तर दुसरीकडे काँग्रेसची अवस्था (Congress Party) बिकट होत आहे. आता उद्धव ठाकरेंनीही काँग्रेसला (Uddhav Thackeray) धक्का दिला आहे. इंडिया आघाडीचा विचार न करता ठाकरेंच्या शिवसेनेने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपला पाठिंबा दिला आहे. समाजवादी पार्टी आणि तृणमूल काँग्रेसच्या पाठिंब्यानंतर ठाकरेंचा पाठिंबा मिळाल्याने आम आदमी पार्टीचं बळ वाढलं आहे. खासदार अनिल देसाई यांनी या निर्णयाची माहिती प्रसारमाध्यमांना दिला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं; ५ फेब्रुवारीला होणार मतदान तर ‘या’ तारखेला मतमोजणी

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही आ आदमी पक्षाला पाठिंबा देत आहोत. याचं कारण म्हणजे आम आदमी पार्टीने महाराष्ट्राच्या निवडणुकीत आम्हाला पाठिंबा दिला होता. आता आम्हाला अशी अपेक्षा आहे की मतांचं विभाजन होणार नाही असे अनिल देसाई म्हणाले.  या निर्णयाचा काँग्रेसला निश्चितच फटका बसणार आहे. तसेही काँग्रेसचे दिल्लीत फारसे अस्तित्व राहिलेले नाही. आताही काही मतदारसंघ सोडले तर काँग्रेस ताकदीने निवडणूक लढताना दिसत नाही.

सपा, तृणमूलचा पाठिंबा; काँग्रेसची कोंडी

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhileh Yadav) यांनी मंगळवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी केजरीवाल यांच्या ‘आप’ला पाठिंबा जाहीर केला. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी त्यांचेही आभार मानले होते. समाजवादी पार्टीप्रमाणेच तृणमूल काँग्रेसनेही आम आदमी पार्टीलाच पाठिंबा दिला आहे. याचा फायदा केजरीवाल यांना निश्चितच होणार आहे. पण, इंडिया आघाडीतीलच मित्रपक्षांनी मात्र काँग्रेसची कोंडी केली आहे.

VIDEO : विधानसभेसाठी केजरीवालांची मोठी खेळी, भाजप मंदिर समितीच्या 100 सदस्यांचा आपमध्ये प्रवेश

इंडिया आघाडीत बिघाडी?

हरियाणामध्ये समाजवादी पक्षाला सोबत घेण्यास काँग्रेसने नकार दिला होता. यानंतर दिल्लीतही इंडिया आघाडी (INDIA Alliance) दुभंगल्याचे दिसत आहे. काँग्रेस आणि आम आदमी पार्टी हे इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहेत. मात्र, त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली.

follow us