धक्कादायक! आता विद्यापीठंही झाली बनावट, युजीसीकडून 32 नावं जाहीर

गेल्या काही दिवसांपासून यूजीसीकडून बनावट विद्यापीठांची फक्त यादी जाहीर केली जात आहे.

Facke

धक्कादायक! आता विद्यापीठंही झाली बनावट, UGC'कडून ३२ नावं जाहीर, महाराष्ट्राचाही समावेश

विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) देशातील ३२ बनावट विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील दोन विद्यापीठांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रवेश घेऊ नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. देशात शिक्षणाच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. देशातील बनावट विद्यापीठांचं जाळं आता १२ राज्यांमध्ये पोहोचलं आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील दोन विद्यापीठांचा तर दिल्लीतील तब्बल १२ विद्यापीठांचा समावेश आहे.

बनावट विद्यापीठांच्या यादीनुसार, दिल्लीनंतर उत्तर प्रदेशात सर्वाधिक ४ बनावट विद्यापीठे आहेत. गेल्या दोन वर्षांत देशातील अशा संस्थांची संख्या २० वरून ३२ झाली आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यार्थी आणि पालकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच प्रवेश घेताना काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे.

या नवीन आकडेवारीनुसार, बनावट विद्यापीठांचं जाळे नवीन चार राज्यांपर्यंत पोहोचलं आहे. त्यामध्ये हरयाणा, राजस्थान, झारखंड आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. यातील गंभीर गोष्ट म्हणजे, ३२ बनावट विद्यापीठांपैकी तब्बल १२ एकट्या दिल्लीत कार्यरत आहेत. विशेष म्हणजे त्यातील काही संस्था यूजीसी मुख्यालयापासून काही मीटर अंतरावर आहेत. नवीन आकडेवारीनुसार, दिल्लीत १२, उत्तर प्रदेशात ४ तर केरळ, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात प्रत्येकी २, तर हरयाणा, राजस्थान, झारखंड आणि अरुणाचल प्रदेशात प्रत्येकी एक बनावट विद्यापीठ आढळून आले आहे.

Galgotias University : एआय समिट, गॅलगोटियास विद्यापीठ अन् रोबोटिक डॉग; नेमका वाद काय?

जर एखादा विद्यार्थी कुठे प्रवेश घेत असेल तर त्याने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन बनावट विद्यापीठांची यादी तपासावी, असे आवाहन यूजीसीने विद्यार्थी आणि पालकांना केले आहे. तर दुसरीकडे यूजीसी फक्त बनावट विद्यापीठांची यादी जाहीर करते पण त्यावर प्रभावी कारवाई करत नाही, असा आरोप करण्यात येत आहे.

या बनावट यादीत महाराष्ट्रातील दोन विद्यापीठांचा समावेश आहे. त्यामध्ये राजा अरबी विद्यापीठ, नागपूर आणि सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय मागासवर्गीय कृषी विद्यापीठाचा समावेश आहे. देशातील बनावट संस्था किंवा विद्यापीठे परदेशी विद्यापीठांची नावे आणि लोगो वापरून स्वतःला वैध ठरवण्याचा प्रयत्न करतात. अलीकडेच, कोलंबिया विद्यापीठाने यूजीसीला पत्र लिहून तक्रार केली आहे की महाराष्ट्रात त्यांचे नाव आणि लोगो वापरून एक बनावट विद्यापीठ कार्यरत आहे. त्यानंतर, यूजीसीने पुन्हा विद्यार्थी आणि पालकांना इशारा दिला.

गेल्या काही दिवसांपासून यूजीसीकडून बनावट विद्यापीठांची फक्त यादी जाहीर केली जात आहे. पण त्या विद्यापीठांवर यूजीसी कारवाई करताना दिसत नाही. आताच काही दिवसांपूर्वी यूजीसीने प्रसिद्धीपत्रक काढून बंगळुरूमधील ‘ग्लोबल ह्यूमन पीस युनिव्हर्सिटी’ या विद्यापीठात प्रवेश घेऊ नये, अशी माहिती दिली होती.

कुठ किती आहेत बनावट विद्यापीठं?

दिल्ली – 12
उत्तर प्रदेश – 4
केरळ – 2
महाराष्ट्र – 2
पश्चिम बंगाल – 2
पुद्दुचेरी – 2

आंध्र प्रदेश – 2
कर्नाटक – 2
हरयाणा – 1

राजस्थान – 1
झारखंड – 1
अरुणाचल प्रदेश – 1

बनावट विद्यापीठांची यादी 
1. क्राइस्ट न्यू टेस्टामेंट डिम्ड युनिव्हर्सिटी, गुंटूर (आंध्र प्रदेश)
2.बायबल ओपन युनिव्हर्सिटी ऑफ इंडिया, विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश)
3.इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन (अरुणाचल प्रदेश)
4.वर्ल्ड पीस ऑफ युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी (दिल्ली)
5.इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड इंजिनिअरिंग (दिल्ली)
6.ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अँड फिजिकल हेल्थ सायन्सेस (AIIPHS) (दिल्ली)
7.कमर्शियल युनिव्हर्सिटी लिमिटेड (दिल्ली)
8.युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी (दिल्ली)
9.वोकेशनल युनिव्हर्सिटी (दिल्ली)
10.ADR-सेंट्रिक ज्युरिडिकल युनिव्हर्सिटी (दिल्ली)
11.इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड इंजिनिअरिंग (दिल्ली)
12.विस्वकर्मा ओपन युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ-एम्प्लॉयमेंट (दिल्ली)
13.अध्यात्मिक विश्वविद्यालया (Spiritual University) (दिल्ली)
14.मॅजिक & आर्ट युनिव्हर्सिटी, फरीदाबाद (हरियाणा)
15.डाक्षा युनिव्हर्सिटी, राँची (झारखंड)
16.सर्व भारतीया शिक्षा पीठ, तुमकूर (कर्नाटक)
17.ग्लोबल ह्युमन पीस युनिव्हर्सिटी, बंगळुरू (कर्नाटक)
18.इंटरनॅशनल इस्लामिक युनिव्हर्सिटी ऑफ प्रॉफेटिक मेडिसिन, कोझिकोड (केरळ)
19.सेंट जॉन्स युनिव्हर्सिटी, किशनत्तम (केरळ)
20.राजा अरबिक युनिव्हर्सिटी, नागपूर (महाराष्ट्र)
21.नॅशनल बॅकवर्ड कृषी विद्यापीठ, सोलापूर (महाराष्ट्र)
22.नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सोल्यूशन (नवी दिल्ली)
23.माउंटन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट & टेक्नॉलॉजी (नवी दिल्ली)
24.उषा लाचुमनन कॉलेज ऑफ एज्युकेशन (पुडुचेरी)
25.श्री बोधि अकादमी ऑफ हायर एज्युकेशन (पुडुचेरी)
26.राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी & मॅनेजमेंट, भिवाडी (राजस्थान)
27.गांधी हिंदी विद्यापीठ, प्रयागराज (उत्तर प्रदेश)
28.नेताजी सुभाष चंद्र बोस युनिव्हर्सिटी (ओपन युनिव्हर्सिटी), अलीगढ (उत्तर प्रदेश)
29.भारतीय शिक्षा परिषद, लखनऊ (उत्तर प्रदेश)
30.महामाया टेक्निकल युनिव्हर्सिटी, नोएडा (उत्तर प्रदेश)
31.इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन, कोलकाता (पश्चिम बंगाल)
32.इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन अँड रिसर्च, कोलकाता (पश्चिम बंगाल)
Exit mobile version