राष्ट्रीय चाचणी एजन्सीकडून नवीन तारखा जाहीर; UGC-NET, CSIR-UGC NET परीक्षा कधी होणार?
UGC NET, CSIR-UGC NET : एनटीएने (NTA) शुक्रवारी रात्री UGC-NET परीक्षेसाठीची नवी तारीख जाहीर केली आहे. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये अनियमितता झाल्यावरून वाद निर्माण झाला असताना रद्द करून ती पुढे ढकलण्यात आली होती. (UGC NET) ती परीक्षा आता UGC-NET परीक्षा (NET) आता २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरपर्यंत होणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे.
राज्याचे सहा लाख कोटींचे बजेट, पण राजकोषीय तूट एक लाख कोटींवर, पैसे कुठून आणणार ?
९ लाख विद्यार्थी
या वेळची फेरपरीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. याबरोबरच ऑल इंडीया आयुष पोस्ट ग्रॅज्युएट प्रवेश परीक्षा दि. ६ जुलै रोजी घेतली जाणार आहे. पेपरफुटी झालेली नेट परीक्षा १८ जूनला दोन सत्रांत ३१७ शहरांमध्ये झाली होती. तेव्हा ९ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
एनटीएकडून खबरदारी विठू माऊलीच्या जयघोषाणे आळंदी परिसर दुमदुमला; माऊलींच्या पालखीचं आज पंढरीकडं प्रस्थान
परीक्षेच्या दुसऱ्याच दिवशी १९ जूनला पेपरफुटीचे प्रकरण समोर आले होते. देशात विविध परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या अनागोंधी कारभाराचं पितळ उघडं पडलं आहे. पेपर फुटीच्या वातावरणामुळं सबंध देश ढवळून निघाला असताना नेट परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी एनटीए ने समाधानकारक पाऊल उचलेलं आहे.
बातमी अपडेट होत आहे-
National Testing Agency (NTA) announces new dates for exams that were postponed earlier
NCET 2024 exam to be conducted on July 10
Joint CSIR UGC NET to be conducted from 25 -27th July
UGC NET June 2024 Cycle to be held between August 21 and September 4 pic.twitter.com/NIIsbgShfN
— ANI (@ANI) June 28, 2024