UGC NET Postponed: 15 जानेवारीला होणारी UGC- NET परीक्षा रद्द, ‘हे’ आहे कारण
UGC- NET Postponed: 15 जानेवारी रोजी होणारी UGC-NET परीक्षा रद्द करण्यात आली असल्याची माहिती एनटीएने दिली आहे. एनटीएने दिलेल्या माहितीनुसार, पोंगल (Pongal) आणि मकर संक्रांतीमुळे (Makar Sankranti) बुधवारी 15 जानेवारी रोजी होणारी UGC-NET रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच लवकरच नवीन तारीख जाहीर करण्यात येणार असल्याची माहितीही एनटीएकडून देण्यात आली आहे.
परीक्षेची नवीन तारीख नंतर अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.ac.in वर अपडेट करण्यात येणार असं एनटीएकडून सांगण्यात आले आहे. तर 16 जानेवारी 2025 रोजी होणारी परीक्षा वेळापत्रकानुसारच आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही एनटीएकडून देण्यात आली आहे.
“पोंगल, मकर संक्रांती आणि इतर सणांमुळे 15 जानेवारी 2025 रोजी होणारी UGC-NET डिसेंबर 2024 ची परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती एनटीएला मिळाली आहे. त्यामुळे उमेदवारांच्या हितासाठी एनटीएने 15 जानेवारी 2025 रोजी होणारी UGC-NET डिसेंबर 2024 ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार. असं एनटीएने एका निवेदनात म्हटले आहे.
जपानमध्ये त्सुनामीचा इशारा 6.8 रिश्टर स्केलचा भूकंपामुळे जमीन हादरली
डिसेंबर 2024 चे UGC NET हॉल तिकिट कसे डाउनलोड करायचे?
हॉल तिकिट डाउनलोड करण्यासाठी सर्वात आधी अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.ac.in वर जा. त्यानंतर होमपेजवर उपलब्ध असलेल्या UGC NET प्रवेशपत्र 2024 लिंकवर क्लिक करा आणि त्यानंतर लॉगिन क्रेडेन्शियल्स सबमिट करा, UGC NET प्रवेशपत्र 2024 डाउनलोड करा.