विठू माऊलीच्या जयघोषाने आळंदी परिसर दुमदुमला; माऊलींच्या पालखीचं आज पंढरीकडं प्रस्थान

विठू माऊलीच्या जयघोषाने आळंदी परिसर दुमदुमला; माऊलींच्या पालखीचं आज पंढरीकडं प्रस्थान

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi : टाळ मृदंगांचा निनाद घुमतोय. हरिनाम माउली नामाचा गजर गजर सुरूये. (Ashadi Wari) खांद्यावर उंचावणाऱ्या भगव्या पताका डौलात दिसतायंत. आणि अधूनमधून मृग नक्षत्राच्या पडणाऱ्या सरी अंगावर झेलत कष्टकरी कामगार शेतकरी हे सगळे वारकरी आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेत. (Palkhi ) आज आळंदीतून माऊलींच्या पालखीच प्रस्थान होणार असल्याने लाखे वारकरी येथे दाखल झालेत.

आळंदीतून पंढरीकडे राष्ट्रीय चाचणी एजन्सीकडून नवीन तारखा जाहीर; UGC-NET, CSIR-UGC NET परीक्षा कधी होणार?

वारीच्या या सुखसोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या मुखातून येणाऱ्या माउलीनामाच्या अखंड जयघोषाने अलंकापुरी भक्तिमय झालीय. आज शनिवारी माउलींच्या पालखीचं प्रस्थान दुपारी चार ते सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आळंदीतून पंढरीकडे होणार आहे. दिंड्यांमधील वारकरी धर्मशाळेत निवारा करत आहेत. काही वारकरी आळंदीजवळील चऱ्होली केळगाव, हनुमानवाडी, चऱ्होली बुद्रुक, वडमुखवाडी, चोविसावाडी, डुडुळगाव मोशी भागात मुक्काम करत आहेत.

ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष अर्थसंकल्पात होणार मोठी घोषणा! राज्यात मुलींना उच्च शिक्षण मिळणार मोफत हा असणार नियम

यंदाच्या वर्षी माउलींचा पालखी सोहळा जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी प्रस्थान करणार आहे. राज्यभरातील बहुतांश शेतकऱ्यांची पेरण्यांची कामं उरकत आली आहेत. शेतकरी पावसाबाबत समाधानी दिसत आहे. यामुळे चार दिवसांपासून आळंदीतील वारकऱ्यांची गर्दी दोन तीन वर्षांपेक्षा अधिक दिसून येत आहे. ठिकठिकाणाहून दिंड्या आळंदीत दाखल होत आहेत. वारीनिमित्त आलेल्या दिंड्या, वारकरी धर्मशाळा आणि राहुट्यांमध्ये विसावल्या आहेत. अखंडपणे ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष कानी ऐकू येत आहे. ठिकठिकाणी फड राहुट्यांमधून तसंच सिद्धबेटात वारकरी पारायण, कीर्तन प्रवचन, नगरप्रदक्षिणा नित्यनेम करताना दिसत आहेत.

कार्यक्रम

  • पहाटे ४ – घंटानाद
  • पहाटे ४.१५ ते ५.३० – काकडा, माउलींच्या समाधीस पवमान अभिषेक
  • ५. ०० ते सकाळी ९.०० – भाविकांच्या महापूजा
  • सकाळी ६ ते दुपारी १२ – समाधी दर्शन
  • सकाळी ९ ते ११ – वीणामंडपात कीर्तन
  • दुपारी १२ ते १२.३० – गाभारा स्वच्छता, समाधीस पाणी घालणे, माउलींना महानैवेद्य
  • दुपारी १२.३० ते १ – समाधी दर्शन
  • दुपारी १.३० ते २ – माऊलींना पोशाखासाठी दर्शन बंद. मानाच्या ४७ दिंड्यांना महाद्वारातून प्रवेश आणि माउलींच्या अश्वांचं आगमन

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज