वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; एसटीच्या 5 हजार गाड्या अन् ग्रुप बुकिंगसाठी थेट दारातून पंढरपुरला गाडी

  • Written By: Published:
वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; एसटीच्या 5 हजार गाड्या अन् ग्रुप बुकिंगसाठी थेट दारातून पंढरपुरला गाडी

मुंबई : आषाढी यात्रेसाठी वर्षभर आतुरतेने वाट बघणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने मोठी घोषणा केली असून, श्री श्रेत्र पंढरपुरला (Pandharpur Ashadi Wari) जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी एसटीने यात्राकाळात 5 हजार विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिली आहे. विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून 40 अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा असे आवाहनही एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे. मागील वर्षी एसटीने आषाढी यात्रे निमित्त 4245 विशेष बसेस सोडल्या होत्या. याव्दारे यात्रा काळामध्ये 18 लाख, 30 हजार, 934 भाविक प्रवाशांची सुखरूप ने-आन एसटीने केली होती. (State Transport Announced Special Buses For Pandharpur Ashadi Wari )

शिवराजसिंह कृषीमंत्री… शेतीत त्यांच्याएवढे ‘पॉझिटिव्ह’ काम अजून कोणालाच जमलेलं नाही…

40 पेक्षा जास्त भाविक असल्यास मिळणार थेट बस

सालाबाद प्रमाणे श्री श्रेत्र पंढरपुर येथे आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक-प्रवाशी येतात. अनेक प्रवाशी स्वत:च्या खाजगी वाहनाने, रेल्वेने, एसटीने अथवा विविध पालखीं बरोबर चालत दिंडीने येतात या प्रवाशांना एसटीने यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. 40 पेक्षा जास्त भाविक प्रवाशांची संख्या असल्यास त्यांना त्यांच्या गावापासून विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या प्रवासात देखील 75 वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी 50 टक्के तिकीट दरात सुट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत.

फुकटया प्रवाशांना लगाम

यात्रा काळामध्ये गर्दीचा फायदा घेऊन तिकीट न काढणे, वाहकाकडून तिकीट मागून न घेणे अशाप्रकारे फुकट प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी एसटीने पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गावर 12 ठिकाणी तपासणी नाके उभारण्याचे नियोजन केले आहे. फुकटया प्रवाशांना अटकाव करण्यासाठी एसटीचे 200 सुरक्षा कर्मचारी व अधिकारी यात्रा काळात 24 तास नजर ठेवून असणार आहेत. यामुळे फुकट्या प्रवाशांना लगाम बसलण्यास मदत होणार आहे.

अजित पवारांच्या वर्चस्वाला धक्का बसणार?; शरद पवारांचे 12 शिलेदार तयार, वाचा लेट्सअप खबरबात

चार तात्पूरर्ती बस स्थानके उभारणार

पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून गाड्या सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार असून जास्तीत जास्त भाविक-प्रवाशांनी, एसटीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज