इंद्रायणी नदी गजबजली; संत तुकाराम महाराज पालखीचे आज प्रस्थान, भाविकांची मोठी गर्दी

इंद्रायणी नदी गजबजली; संत तुकाराम महाराज पालखीचे आज प्रस्थान, भाविकांची मोठी गर्दी

Sant Tukaram Maharaj Palkhi : संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आषाढी वारीसाठी आज दुपारी दोन वाजता देहूमधून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्य देऊळवाड्यातील भजनी मंडपाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. टाळ मृदुंग आणि विठुनामाच्या नामघोषात राज्याच्या कानाकोपऱ्यातून गुरुवारी काल अनेक दिंड्या दाखल झाल्यात. (Palkhi ) इंद्रायणी नदीचा काठ भाविकांच्या गर्दीने फुललाय. (Sant Tukaram Maharaj) तर, पावसाने किरकोळ हजेरी लावल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

पहिल्या विसावा संसदेत ‘जय पॅलेस्टाईन’ ची घोषणा देणाऱ्या ओवैसींच्या घरावर शाईफेक; अमित शाहंना ट्विट करत सवाल

पंढरीतील आपल्या विठुरायाला भेटण्यासाठी आतुर झालेले वारकरी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी देहूत दाखल झाले आहेत. मुख्य देऊळवाड्यात पहाटेपासून वारकऱ्यांनी दर्शनासाठी गर्दी केलीयं. देहू नगरपंचायत प्रशासनाने सोहळ्यातील भाविकांना विविध सोयी-सुविधा मिळाव्यात म्हणून सर्व तरायी पूर्ण करून ठेवलीयं. पालखी मार्गावर देहू ते देहूरोड दरम्यान रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले आहेत. देहूरोड कॅटोन्मेंट बोर्डाच्या वतीने भाविकांसाठी पाण्याचे टॅंकर उपलब्ध करून दिले आहेत. तसंच शनी मंदिराजवळील पहिल्या विसावा ठिकाणी मैदानाचं सपाटीकरण करण्यात आलं आहे.

अन्नदानाची सोय 

प्रसाद आणि वारीतील किरकोळ साहित्य खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये भाविकांची गर्दी दिसून आली. भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी शासनाचे दहा टॅंकर देहूत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नगरपंचायत प्रशासनाकडून चोवीस तास पाणी पुरवठाही करण्यात येत आहे. वीज वितरण कंपनीचे अधिकारी गावात तळ ठोकून आहेत. संत तुकाराम महाराज अन्नदान मंडळ, इस्कॅान यांच्याकडून भाविकांसाठी अन्नदानाची सोय केली आहे. पालखी सोहळ्यातील भाविकांना मदत करण्यासाठी ग्रामस्थांनी तयारी केली आहे.

सुमारे पाचशे पोलीस कर्मचारी तैनात आता 70 वर्षांपुढील सर्वांचे आयुष्यमान योजनेंतर्गत मोफत उपचार; राष्ट्रपती मुर्मू यांनी केली घोषणा

राज्याच्या विविध भागांतून मानकरी, सेवेकरीही दाखल झाले आहेत. पालखी सोहळ्यातील प्रमुख आकर्षण असलेल्या चांदीच्या रथाला पॅालिश करण्यात आलं आहे. पालखी सोहळ्यातील मानाचे अश्व, रथाला जुंपण्यात येणारी बैलजोडी गावात दाखल झाल्याचं पालखी सोहळा प्रमुख विशाल महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे यांनी सांगितलं. नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने निर्मल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी देहूत ११०० स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. येथे सुमारे पाचशे पोलीस कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज