संसदेत ‘जय पॅलेस्टाईन’ ची घोषणा देणाऱ्या ओवैसींच्या घरावर शाईफेक; अमित शाहंना ट्विट करत सवाल

संसदेत ‘जय पॅलेस्टाईन’ ची घोषणा देणाऱ्या ओवैसींच्या घरावर शाईफेक; अमित शाहंना ट्विट करत सवाल

Throw ink on Asaduddin Owaisie house after Declared Jai Palestine : अठराव्या लोकसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवस सर्व खासदारांचा शपथविधी पार पडला. त्यावेळी शपथ घेताना पाचव्यांदा खासदार म्हणून शपथ घेताना एआयएमआयएमचे (Aimim) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी (Asaduddin Owaisi) ‘जय पॅलेस्टाईन’ ची (Jai Palestine) घोषणा दिली होती. त्यानंतर आता त्यांच्या घरावर अज्ञातांनी शाई फेक केली आहे. स्वतः ओवेसी यांनी ट्विट करत ही माहिती दिली. तसेच त्यांनी खासदारांच्या सुरक्षेबद्दल गृहमंत्री अमित शाहंना सवाल केला आहे.

मोठी बातमी! ‘या’ स्मार्टफोन्सवर चालणार नाही व्हॉट्सॲप, पहा संपूर्ण लिस्ट

काय म्हणाले ओवेसी?

या ट्विटमध्ये ओवेसी म्हणाले की, काही अज्ञात हल्लेखोरांनी माझ्या घरावर शाईफेक करत तोडफोड केली. माझ्या दिल्लीतील घरावर देखील कित्येक वेळा लक्ष्य करण्यात आलेले आहे. दिल्ली पोलिस आणि अधिकाऱ्यांच्या देखरेख असतानाही त्यांच्या नाकाखाली असे प्रकार घडत आहेत. तसेच अमित शाह यांचीही देखरेख असताना हे घडत आहे.

तसेच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगावं की खासदारांना सुरक्षिततेची हमी दिली जाणार की आहे. माझ्या घराला लक्ष्य करणाऱ्या दोन गुडांना मी घाबरत नाही. हे सावरकर सारखे भ्याड प्रकार थांबवा मला तोंड देण्यासाठी फक्त पुरूष व्हा. शाई कींवा दगड फेकून पळून जाऊ नका. असं म्हणत ओवेसी यांनी त्यांच्या घरावर अज्ञातांनी शाई फेक केल्याची माहिती दिली. तसेच गृहमंत्री अमित शाह आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सवाल केला आहे.

अर्थसंकल्पात होणार मोठी घोषणा! राज्यात मुलींना उच्च शिक्षण मिळणार मोफत; ‘हा’ असणार नियम

दरम्यान संसदेत खासदारकीची शपथ घेतल्यानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी जय भीम, जय मीम, जय तेलंगणा आणि जय पॅलेस्टाईन अशी घोषणा दिली होती. त्यांनी दिलेल्या या घोषणेनंतर सत्ताधारी भाजपच्या काही खासदारांकडून याचा विरोध करण्यात आला आणि सभागृहात गदारोळ झाला. तर या घोषणेवरून त्यांचे संसदेचे सदस्यत्व काढून टाकण्याची मागणी करण्यात येत आहे. यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र देखील लिहिण्यात आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube