पुण्यात ससूनच्या ‘त्या’ अधिकाऱ्यांच्या घरावर ACB ची छापेमारी; कोट्यावधींचे घबाड जप्त

ACB raids on house of Sassoon officials seized crores : पुण्याच्या ससून रूग्णालायाच्या अधिकाऱ्यांच्या घरावर ACB ने छापेमारी केली आहे. या कारवाईमध्ये कोट्यावधीचे घबाड जप्त करण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांना काल बुधवारी 2 एप्रिल 2025 ला 1 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर ACB ने आज या अधिकाऱ्यांच्या घरावर छापेमारी केली आहे. या कारवाईमध्ये कोट्यावधी रूपयांची मालमत्ता ताब्यात घेण्यात आली आहे.
सोलापूरमध्ये भूकंप, नागरिकांत भीतीचं वातावरण…
यामध्ये ससून रूग्णालायाचे अधिकारी सुरेश बनवले आणि जयंत चौधरी या दोघांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांना काल बुधवारी 2 एप्रिल 2025 ला 1 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर आज सकाळी या अधिकाऱ्यांच्या घरी छापे मारले असता या छापेमरीत जयंत चौधरी याच्या घरून 39 लाख रुपये तर तर सुरेश बनवले याच्या घरून ACB ने जप्त केली 1 कोटी 35 लाख 95 हजार रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यानंतर या दोघांना कोर्टा समोर हजर करण्यात येणार आहे.
ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर, दीपक केसरकरांनी केला मोठा गौप्यस्फोट
दरम्यान गेल्या काही वर्षांमध्ये पुण्याचे ससून रूग्णालय नेहमीच वादग्रस्त प्रकरणांनील चर्चेत येत आहे. त्यात आता या अधिकाऱ्यांच्या लाचखोरीची भर पडली आहे. यामध्ये ड्रग्ज रॅकेट प्रकरण, येरवड्यातील कैदी ससूनमध्ये उपचारा दरम्यान फरार झाला होता. त्यात देखील ससूनच्या काही अधिकाऱ्यांची नावं समोर आली होती. त्यानंतर निलंबन आणि इतर कारवाया देखील करण्यात आल्या होत्या मात्र अद्याप देखील ससूनमध्ये हे प्रकार काही थांबलेले नाही.