Ujjain Hanuman Idol: सोशल मीडीयावर उज्जैनच्या हनुमान मुर्तीची चर्चा होत आहे. झालं असं की, उज्जैनमध्ये सिंहस्थ महाकुंभ 2028 ची जोरदार तयारी सुरु आहे. याठिकाणी रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु असताना रस्त्याच्या मधोमध असलेले ‘खडे हनुमानाचे मंदिर’ हटवण्याचा निर्णय तेथील प्रशासनाने घेतला. मग प्रशासनाच्या अभियंत्यांच्या पथकाने ते हनुमानाचं मंदिर हटवण्याचा प्रयत्न केला. पण ते हनुमानाची मुर्ती (Ujjain Hanuman Idol) एक इंचसुद्धा हलवू शकले नाहीत. ही मुर्ती हटवण्यासाठी प्रशासनाने तीन दिवस प्रयत्न केले. पण त्याचे प्रयत्न काही यशस्वी झाले नाहीत.
मुंबईतील प्रसिद्ध गजानन वडापाव; शेळके मामा ढाब्याला एफडीएचा दणका; तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्या
उज्जैनच्या कंठाल चौकापासून छत्री चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम सुरु आहे. या रस्त्याच्या मधोमध असलेले जवळपास 170 वर्षे जुनं असलेलं हनुमान मंदिर हटवण्याचे प्रशासनाने प्रयत्न केले. त्या छोट्याश्या मंदिराच्या चारही भिंती जेसीबीने पाडल्या. पण प्रशासन क्रेन, अत्याधुनिक यंत्रे लावूनही मुर्ती हलवू शकलं नाही. या घटनेनंतर लोकांनी त्याठिकाणी गर्दी केली. त्यांना तो हनुमानाचा चमत्कारच वाटला. प्रसासनाचे हे प्रयत्न सुरु असताना तेथील उपस्थित लोकांनी या सुरु असलेल्या प्रयत्नांचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि व्हिडीओ व्हायरलही झाला.
“भीमनवारांचा राजीनामा घ्या; तुकाराम मुंढेंना MPSC अध्यक्ष करा”, रोहित पवारांची मागणी!
आता या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे की, आम्ही मुर्ती हटवणारच नव्हतो किंवा ती दुसरीकडे प्रस्थापित करण्याचा विचार प्रशासनाचा नव्हता, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले. पण प्रशासनाने माघार घेतली, अशी चर्चा स्थानिकांमध्ये आहे. आता या हनुमानाच्या मुर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी जमत आहे.
