Umar Khalid : जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिदला दिल्लीच्या कर्करडूमा न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने उमर खालिदला सात दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला. न्यायालयाने उमर खालिदला 28 डिसेंबर ते 3 जानेवारीपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
उमर खालिदला (Umar Khalid) बहिणीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी सात दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर न्यायालयाने मंजूर केला आहे. उमर खालिदवर 2020 च्या दिल्ली दंगलीचा कट रचल्याचा आरोप आहे.
तर यापूर्वी उमर खालिद आणि मीरान हैदर यांनी डिसेंबरच्या सुरुवातीला समानता, खटल्याला होणारा विलंब आणि दीर्घ कारावास या कारणांवरून जामीनही मागितला होता. तर प्रकरणी पोलिसांनी जबाब सादर करण्यासाठी वेळ मागितला होता. माहितीनुसार, दिल्ली दंगलीत 53 लोकांचा मृत्यू झाला होता तर 700 हून अधिक लोक जखमी झाले होते. या घटनेनंतर उमर खालिदला 13 सप्टेंबर 2020 रोजी अटक करण्यात आली होती. चार वर्षांहून अधिक काळापासून उमर खालिद तुरुंगात आहे.
#BREAKING Delhi Court grants interim bail to Umar Khalid in Delhi riots larger conspiracy case.
Interim bail granted for 7 days for attending family marriage. #UmarKhalid #DelhiRiots pic.twitter.com/Sik55sm7TM
— Live Law (@LiveLawIndia) December 18, 2024
उमर खालिद यांच्यावर हिंसाचाराचा किंवा पैसे गोळा केल्याचा कोणताही आरोप नाही. असं 7 डिसेंबर रोजी उमर खालिदच्या नियमित जामीन याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान उमरच्या वकिलाने उच्च न्यायालयाला सांगितले होते. पुढे बोलताना वकील त्रिदीप पैस म्हणाले होते की, उमर खालिदच्या बाजूने एकमेव थेट आरोप महाराष्ट्रातील अमरावती येथे दिलेले भाषण आहे. या भाषणातही खालिदच्या बाजूने हिंसाचाराचे आवाहन नव्हते. असं वकील त्रिदीप पैस म्हणाले.
प्रसाद ओकच्या केसची धुरा सांभाळणार स्वप्नील जोशी, जिलबी चित्रपटाचा दमदार टिझर प्रदर्शित
उमर खालिदवर आरोप काय?
उमर खालिदने सुरुवातीला सर्वेच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता पण सर्वेच्च न्यायालयाने उमरला खालच्या कोर्टात जाण्याचा सल्ला दिला होता. उमरवर आयपीसी, 1967 शस्त्रास्त्र कायदा आणि बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. याशिवाय आयपीसीच्या विविध कलमान्वयेही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.