Union Budget 2023 : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) 2023-24 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प (Budget 2023) सादर करण्यात आला. यामध्ये मोबाईल फोन, टीव्ही, इलेक्ट्रिक वाहनं स्वस्त झाली आहेत. तर चांदीचे दागिने, चांदीची भांडी महाग झाली आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. अशा परिस्थितीत अर्थसंकल्पातून दिलासा मिळणार, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान अर्थसंकल्पीय भाषणाची सुरुवात करताना निर्मला सीतारमण म्हणाल्या की, जगाने भारतीय अर्थव्यवस्थेला एक चमकता तारा मानले. जगात भारताचा मान वाढला. भारतीय अर्थव्यवस्था योग्य दिशेने वाटचाल करत आहे आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहे. त्या म्हणाले की, (Nirmala Sitharaman) अर्थसंकल्पात रेल्वेसाठी (Railway Budget) 2.40 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 2013 वर्षाच्या तुलनेत 9 पटीनं बजेट वाढवले असल्याचे निर्मला सीतारमण यांनी सांगितले.
काय स्वस्त होणार?
मोबाईल
टीव्ही आणि टीव्हीचे सुटे भाग
इलेक्ट्रिक वाहने
खेळणी
कॅमेरा लेन्स
सिगरेट
काय महाग?
सोने-चांदी दागिने महागणार
विदेशी किचन चिमणी
चांदीचे दागिने
चांदीची भांडी