Download App

Corona Alert : कोरोनावाढीवर केंद्र सरकार अलर्ट मोडवर; दिले मॉक ड्रिलचे आदेश

Union Health Minister Dr Mansukh Mandaviya virtually interacted with State Health Ministers :  देशातील वाढत्या कोरोनाच्या संख्येमुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर आले आहे. केंद्र सरकारच्यावतीने सर्व राज्यांना गाइ़लाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. आज देशाचे आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक घेतली आहे. या बैठकीत त्यांनी कोरोना वाढीवर समीक्षा करण्यात आली. या बैठकीनंतर राज्य सरकारांना गाइडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना सर्व राज्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी सर्व राज्यातील आरोग्य मंत्र्यांना 10 व 11 एप्रिल रोजी हॉस्पिटल मध्ये मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले आहे. तसेच 8 व 9 एप्रिल रोजी जिल्हा प्रशासन व आरोग्य अधिकाऱ्यांना कोरोनाच्या तयारीची समीक्षा करण्यासाठी सांगितले आहे.

खात्यात पैसे नाही तरी UPI द्वारे पेमेंट होणार…जाणून घ्या कसे काय

पुदुच्चेरी येथे सर्वांना मास्क बंधनकारक करण्यात आलेले आहेत. सार्वजनिक ठिकाणी, रोडावर, पार्क व थिएटरमध्ये मास्क घालणे बंधनकारक असणार आहे, असे जिल्हा कलेक्टर ई वल्लवन यांनी सांगितले आहे. याचबरोबर हॉस्पिटल, हॉटेल, बार, रेस्टॉरंट, दारुची दुकानं, थिएटर, सरकारी कार्यालये या ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.

TIME 100 पोलमध्ये बादशाहा शाहरुख अव्वल स्थानी

दरम्यान देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. देशात गेल्या 24 तासांत 6,050 नवे रूग्ण आढळून आले आहेत. तसेच 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 28 हजार 303 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं गरजेचं असल्याचं देखील प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

Tags

follow us