Union Home Minister orders security mock drills to states after India-Pak War of 1971 : जम्मू-कश्मीरमधील पहलगाम दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. यात 26 जणांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यात आता केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी 5 एप्रिल 2025 रोजी मोठं पाऊल उचललं आहे. ज्यामध्ये देशभरातील अनेक राज्यांना सुरक्षा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गृहमंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या या पत्रकामध्ये 7 मे 2025 रोजी नागरी सुरक्षेसाठी प्रभावीपणे मॉक ड्रीलचे आयोजन केले जावे. जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीमध्ये लोकांना सुरक्षित ठेवलं जाऊ शकतं. यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धाची आठवण झाली आहे.
या मॉक ड्रीलमध्ये विशेषतः काही गोष्टींवर भर देण्यात आला आहे. ज्यामध्ये हवाई हल्ल्यादरम्यान अलर्ट करणारा सायरन वाजवला जावा. हल्ला झाल्यास नागरिकांनी विद्यार्थ्यांनी स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं? याचं ट्रेनिंग दिलं जावं. हल्ल्याच्या वेळी ब्लॅक आउट करण्यात येतं. त्याचे देखील मॉक ड्रीलमध्ये समावेश करावा. महत्त्वाच्या संस्था आणि संसाधनं हल्ल्याच्या वेळी लपवले जातात. त्याप्रमाणे तेही लपवले जावेत. तसेच लोकांना जागा खाली करणे किंवा घरं कशाप्रकारे सोडायची याचा सराव करायला लावावा. असे या पत्रकामध्ये सांगण्यात आला आहे.
Mahadev Jankar : रासप नेत्याने घेतली राहुल गांधींची भेट.., जानकरांच्या डोक्यात नक्की काय?
दरम्यान या अगोदर 1971 साली ज्यावेळी भारत-पाकिस्तान युद्ध झालं होतं. त्यावेळी असा असं मॉक ड्रिल करण्यात आलं होतं. त्यामुळे नुकत्याच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये वाढलेला तणाव पाहता युद्ध होणार असल्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे सुरक्षा अभ्यास किंवा सुरक्षा सराव केला जात आहे का? अशा चर्चा देशभरात सुरू झाल्या आहेत.
तसेच ज्यावेळी युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये युद्ध सुरू होतं. त्यावेळी देखील नागरिकांना अशा प्रकारे अलर्ट करण्यासाठी मोहीम राबवली जात होती. त्याचबरोबर डिजिटल पद्धतीने देखील नागरिकांना सतर्क केले जात होतं. यासाठी एअर अलार्म ॲप वापरलं गेलं. ज्यामध्ये तुमचा फोन सायलेंट किंवा स्लीप मोडवर असतो. तेव्हा देखील तुम्हाला अलर्ट येऊ शकतो. यासाठी कोणत्याही पर्सनल डेटाची गरज नव्हती. नोटिफिकेशन साठी देखील खास एरिया निवडला जाऊ शकतो.
Video : राखी सावंतकडून पाकिस्तानचा उदो-उदो; व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांसह मनसे आक्रमक
दरम्यान भारताकडून पहलगाम हल्ल्यानंतर उचलण्यात आलेली तातडीची वेगवेगळी पावलं आणि पाकिस्तानला देण्यात आलेला इशारा त्यामुळे पाकिस्तानला भारताकडून हल्ला केला जाणार असल्याची भीती आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून कधी संयुक्त राष्ट्र तर कधी अमेरिकेकडे साकडे घातले जात आहे.