Download App

Union Minister च्या घरात आढळला तरूणाचा मृतदेह; मंत्र्याच्या मुलाच्याच पिस्तुलातून झाडली गोळी

  • Written By: Last Updated:

Union Minister : केंद्रिय मंत्री कौशल किशोर (Union Minister) यांच्या उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील घरामध्ये एका तरूणाचा मृतदेह आढळला आहे. तर या तरूणाला किशोर यांचा मुलगा विकास याच्या पिस्तुलातून गोळी झाडण्यात आली आहे. ही गोळी या तरूणाच्या डोक्यात झाडण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. विनय श्रीवास्तव असं या 24 वर्षीय तरूणाचं नाव असून तो किशोर यांचा मुलगा विकास याचा मित्र होता. त्यामुळे त्याचा मृतदेह किशोर यांच्याच घरात आढळल्याने संशयाची सुई या कुटुंबावर फिरत आहे.

Seema Haider: कपिल शर्माच्या शो ची ऑफर आल्यानंतर सीमा हैदरचे थेटच उत्तर; म्हणाली…

काय आहे नेमकं प्रकरण?

उत्तर प्रदेशातील लखनऊ जिल्ह्यातील दुबग्गाच्या बेगरियामध्ये केंद्रिय मंत्री कौशल किशोर (Union Minister) यांचं नवं घर आहे. या घरामध्ये भाजप कार्यकर्ता असलेला विनय श्रीवास्तव आणि केंद्रिय मंत्री कौशल किशोर यांचा मुलगा विकास हे दोघं राहत होते. यावेळी आज सकाळी पहाटे चार वाजेच्या सुमारास विकासच्या पिस्तुलातून गोळी झाडण्यात आली.

Ravindra Dhangekar : ‘नरेंद्र मोदी पुण्यातून लढले तर त्यांचा पराभव करू’; धंगेकरांचं खुलं आव्हान…

ही गोळी विनयच्या डोक्यात झाडण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह बेडजवळ आढळून आला. यावेळी अजय रावत, अंकित वर्मा, शमीम बाबा आणि बंटीसह इतर दोन जण तेथे होते. त्यामुळे विनयच्या नातेवाईकांनी अंकित आणि शमीमनेच विनयची हत्या केल्याचा आरोप केला आहे. तर या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्कळ घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी प्राथिक तपास करत पोलिसांनी विनयला गोळी झाडण्यात आलेलं पिस्तुल ताब्यात घेतलं आहे. तर तीन जणांना देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. विनयचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

दरम्यान केंद्रिय मंत्री कौशल किशोर (Union Minister) यांनी या घटनेची संपूर्ण माहिती पोलिसांना आणि पोलीस कमिशनर यांना दिली. त्यानंतर त्या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांसह फॉरेन्सिक आणि डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांने सांगितलं की, तीन जणांना देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. मात्र या दरम्यान केंद्रिय मंत्र्याच्या घरात हा मृतदेह आढळल्याने तसेच तरूणाला गोळी देखील मंत्र्याच्या मुलाच्यात पिस्तुलातून घालण्यात आल्याने खळबळ माजली आहे.

Tags

follow us