माजी आयएएस अधिकारी दिव्या मित्तल यांची राजकारणात एन्ट्री; स्वतंत्र राजकीय पक्षाची घोषणा
Divya Mittal : दिव्या मित्तल यांनी स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केलीय.
Former IAS Divya Mittal : 13 वर्षांची प्रशासकीय सेवा सोडल्यानंतर माजी आयएएस अधिकारी दिव्या मित्तल (Divya Mittal) यांनी आता राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मित्तल यांनी मंगळवारी स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या ( Uttar Pradesh Election 2027) राजकारणात एका माजी सनदी अधिकाऱ्याची नवी राजकीय इनिंग सुरू होणार आहे.
Student Life : 15 % तणावात, ९ टक्के टोकाच्या विचारात; पालकांची झोप उडवणारी माहिती
काही दिवसांपूर्वी दिव्या मित्तल यांनी आयएएस पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्या राजकारणात प्रवेश करणार की अन्य कोणता मार्ग स्वीकारणार, याबाबत चर्चा सुरू होती. अखेर त्यांनी स्वतः पुढे येत आपल्या राजकीय वाटचालीचे संकेत दिले आहेत. दिव्या मित्तल यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ संदेशातून जनतेशी संवाद साधला. तुम्हाला वाटत असेल की हा तुमचा आवाज आहे, तर दिलेल्या WhatsApp क्रमांकावर संदेश पाठवा,” असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यासाठी त्यांनी 9198956957 हा क्रमांक दिला आहे.
World Heart Day : 8 तास खुर्चीवर, 1 तास जिममध्ये; हृदयासाठी हे समीकरण खरंच योग्य?
2027 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवा राजकीय प्रयोग
उत्तर प्रदेशात 2027 च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. दिव्या मित्तल यांनी स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केलीय. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाकडे उत्तर प्रदेशच्या राजकारणातील वेगळा प्रयोग म्हणून पाहिले जात आहे. आयएएस पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर आपल्या पुढील वाटचालीबाबत विविध पर्यायांचा उल्लेख केला होता. कुटुंबाला वेळ देणे, परदेशात परत जाणे, कोचिंग सुरू करणे, पुस्तक लिहिणे किंवा राजकारणात प्रवेश करणे, असे पर्याय त्यांनी मांडले होते. अखेर त्यांनी राजकारणाची वाट निवडली.
सुरुवातीच्या टप्प्यात जनतेशी थेट संवाद आणि डिजिटल माध्यमांचा वापर करण्यावर त्यांचा भर असल्याचे त्यांच्या संदेशातून दिसून येते. मात्र, नव्या पक्षाची विचारधारा, संघटनात्मक रचना, सदस्यत्व, निवडणूक रणनीती आणि आगामी काळातील राजकीय भूमिका याबाबतची अधिकृत माहिती पुढील घोषणांनंतर स्पष्ट होणार आहे.
कुछ दिन पहले IAS से त्यागपत्र दिया था और आपके मन में कई सवाल छोड़ दिए थे। अपनी बात इस वीडियो में कह दी है। अगर आपको लगे कि ये आपकी भी बात है, तो 9198956957 पर whatsapp मैसेज करिए। pic.twitter.com/mtS6gzBzRw
— Divya Mittal (@divyamittal_IAS) September 29, 2026
13 वर्षांच्या प्रशासकीय सेवेनंतर नवी राजकीय इनिंग
दिव्या मित्तल या 2013 बॅचच्या IAS अधिकारी आहेत. त्यांनी 30 ऑगस्ट रोजी प्रशासकीय सेवेतून राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यांचा राजीनामा 15 सप्टेंबर 2026 रोजी शासनाने स्वीकारला. त्यानंतर त्यांच्या जवळपास 13 वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीचा समारोप झाला.
मीरजापूरच्या लहुरियादह गावात पोहोचवले होते पाइपलाइनद्वारे पाणी
दिव्या मित्तल यांनी IIT दिल्ली आणि IIM बंगळुरू येथून शिक्षण घेतले आहे. प्रशासकीय सेवेत येण्यापूर्वी त्यांनी परदेशातही काम केले होते. उत्तर प्रदेशातील संत कबीरनगर, मीरजापूर आणि देवरिया यांसह अनेक जिल्ह्यांत त्यांनी जिल्हाधिकारी म्हणून काम केले. मीरजापूरच्या लहुरियादह गावात पाइपलाइनच्या माध्यमातून पाणी पोहोचवण्याच्या उपक्रमामुळे त्यांना विशेष ओळख मिळाली होती. प्रशासकीय कारकिर्दीत दिव्या मित्तल यांनी मेरठमध्ये संयुक्त दंडाधिकारी, गौतमबुद्ध नगरमध्ये मुख्य विकास अधिकारी (CDO), कानपूर नगरमध्ये UPSIDAच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आणि बरेली विकास प्राधिकरणाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. यानंतर त्यांनी संत कबीरनगर आणि मीरजापूरच्या जिल्हाधिकारी म्हणूनही काम केले. आता प्रशासकीय सेवेनंतर त्या थेट राजकारणात उतरणार असून, उत्तर प्रदेशच्या राजकीय क्षेत्रात त्यांची पुढील भूमिका काय असेल, याकडे लक्ष लागले आहे.