राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाटच पाहतात परंतु जिवंत मासा नेहमी… पक्षांतरावरून गडकरींचे खडेबोल

Union Minister Nitin Gadkari हे नेहमीच त्यांच्या सडेतोड वक्तव्यांसाठी ओळखले जातात. यावेळी त्यांनी पक्षांतर करणाऱ्यांवर असंच एक विधान केलं आहे.

Nitin Gadkari

Nitin Gadkari

Union Minister Nitin Gadkari Criticize to Defection : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच त्यांच्या सडेतोड वक्तव्यांसाठी ओळखले जातात. त्यांच्यासाठी टीका ही योग्य किंवा अयोग्य गोष्टींवर असते. मग ती स्वपक्षीयांवर असो की विरोधकांवर यावेळी देखील त्यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर असंच एक विधान केलं आहे.

नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी?

अमरावतीमधील शिवाजी एज्युकेशन सोसायटीचेचेअरमन हर्षवर्धन देशमुख यांच्या अमृत महोत्सवी वर्ष अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची देखील उपस्थिती होती.

प्राजक्त तनपुरेविरुद्ध महाविकास आघाडीचा उमेदवार नाही; करण ससाणे अपक्ष, सचिन जगतापांचा यूटर्न !

त्याच कार्यक्रमातील भाषणात बोलताना त्यांनी पक्षांतरांवरून नेत्यांची नेत्यांचे कान उपटले. गडकरी म्हणाले की, सध्या राजकारणात 90% खेळाडू हे कोणत्या पक्षाचं सरकार येत आहे. त्यामध्ये कोण मत्री होते. याची वाटच पाहत असतात. त्यांचे झेंडे, दंडे, हार तयारच असतात मग त्यांनी पक्ष सोडलेला असो हेही त्यांना कळत नाही आणि ते ज्या पक्षात गेले आहेत ते देखील त्यांना समजत नाही. हे मी कुणा एकाबद्दल बोलत नाही. पण राज्यांमध्ये अशी परिस्थिती होण्याचं कारण असं आहे की, राजकारणात तत्वनिष्ठ, ध्येयनिष्ठा, विचारनिष्ठा कमी झाली आहे. त्याचबरोबर आपल्या देशामध्ये फक्त विचार भिन्नता राहिली नाही. तर विचारशून्यता निर्माण झाली आहे.

भाजपकडून आयारामांना संधी; पक्षात प्रवेश करताच उमेदवारी, निष्ठावंतांची नाराजी उघड

कधी वाईट दिवस असतात, कधी चांगले दिवस असतात. कधी जनता निवडून देती, कधी निवडून देत नाही. मात्र जिवंत माशाचं व्यक्तिमत्व असं असतं की तो प्रवाह बरोबर वाहत जात नाही. जिवंत मासा नेहमीच प्रवाहाच्या विरुद्ध पोहतो. मात्र काडी-कचरा आणि मेलेला मासा हा नेहमी प्रवाहाबरोबर वाहत असतो. असं म्हणत यावेळी नितीन गडकरी यांनी पक्षांतर करणाऱ्या आणि त्यातून उमेदवारी मिळवणाऱ्या नेत्यांवर सडेतोड वक्तव्य केलं आहे.

Exit mobile version