गडकरींचा ‘व्हीआयपी’ ताफ्याला ब्रेक! महाराष्ट्राचा दौरा लाल दिव्याच्या गाडीतून नाही, तर ‘बस’ने करणार

Nitin Gadkari रस्ते आणि वाहतूक क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा आपल्या कृतीतून नवा आदर्श घालून दिला आहे.

Nitin Gadkari

Nitin Gadkari

Union Minister Nitin Gadkari Travel By Bus After PM Modi Fuel Saving Appeal : रस्ते आणि वाहतूक क्षेत्रात क्रांती घडवणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा आपल्या कृतीतून नवा आदर्श घालून दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत, गडकरी यांनी त्यांचा आगामी महाराष्ट्र दौरा बसने करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे त्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या चक्क 50 टक्क्यांनी कमी होणार आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाने याची घोषणा करणारे पत्रक जारी केले आहे.

PM मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांचे परदेश दौरे रद्द

नेमका काय आहे दौरा?

येत्या 14 आणि 15 मे 2026 रोजी नितीन गडकरी पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याचा मुख्य उद्देश संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग प्रकल्पाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करणे हा आहे. वारीच्या आधी या मार्गाची स्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी गडकरी स्वतः रस्त्यावर उतरणार आहेत.

एकाच बसमध्ये मंत्री, अधिकारी आणि पत्रकार

मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार, या प्रवासात केवळ मंत्रीच नव्हे, तर त्यांचे संपूर्ण सुरक्षा कर्मचारी, मंत्रालयाचा स्टाफ आणि निमंत्रित पत्रकार देखील एकाच बसमधून प्रवास करतील. यामुळे मंत्र्यांच्या मागे धावणाऱ्या गाड्यांची लांबच लांब रांग या दौऱ्यात पाहायला मिळणार नाहीये. मंत्रालयाने पुणे, सातारा आणि सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून, यात्रेदरम्यान ताफ्यातील वाहनांची संख्या 50 टक्क्यांनी कमी करण्याची विनंती केली आहे.

तुमची मन की बात खूप झाली आता अर्थतज्ज्ञांची मन की बात पण ऐका; मोदींच्या काटकसरीच्या आवाहनावर राज ठाकरेंचे संतप्त सवाल

वाहतूक कोंडीतून सर्वसामान्यांना दिलासा

मंत्र्यांचा दौरा म्हटला की, रस्ते बंद केले जातात आणि सर्वसामान्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मात्र, ताफ्यातील गाड्या कमी झाल्यामुळे आणि गडकरींनी बस प्रवासाचा पर्याय निवडल्यामुळे वाहतूक व्यवस्थेवरचा ताण कमी होणार आहे.

Exit mobile version