अर्रर्र! वाहतूकमंत्रीच अडकले पुण्याच्या वाहतूक कोंडीत, दौराच केला रद्द

अर्रर्र! वाहतूकमंत्रीच अडकले पुण्याच्या वाहतूक कोंडीत, दौराच केला रद्द

Union Minister Nitin Gadkari Stuck In Pune Traffic Jam : पुण्यातील ट्राफिक ही सर्वांसाठीच डोकेदुखी आहे. आता या ट्राफिकमध्ये चक्क वाहतूकमंत्रीच अडकल्याचं समोर आलंय. वाहतूकमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) पुणे दौऱ्यावर होते. ते भुयारी मार्गाची पाहणी करणार होते. परंतु वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे नितीन गडकरी यांनी दौराच रद्द केलाय. या प्रकाराने आता पुन्हा एकदा पुण्यातील वाहतूक समस्या चर्चेत (Pune Traffic Jam) आली आहे.

नागरिकांना मनस्ताप

नितीन गडकरींचा दौरा असल्याने नागरिकांना मनस्ताप सोसावा लागला. गडकरी बाजीराव रस्ता ते शिवाजी रस्ता प्रस्तावित भुयारी चौपदरी मार्ग प्रकल्पाची पाहणी करणार होते. परंतु वाहतूक कोंडीच्या समस्येला वैतागून पण फक्त निवेदन घेऊन पाहणी न करताच (Maharashtra Politics) निघून गेले. पुणे शहरातील मुख्य भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रकल्प महत्वाचा होता.

भारतात फक्त 16 दिवसांचा एलपीजी साठा, इराण-इस्रायल युद्धाचा मोठा फटका

पुण्यातील वाहतूक कोंडी

देशभरामध्ये प्रशस्त रस्त्यांचे जाळे विणणारे केंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी वाहतूक कोंडीत अडकले. त्यांना पुण्याच्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. गडकरी यांची गाडी पुढे जात (Union Minister Nitin Gadkari) नव्हती. त्यामुळे पोलीस बघून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केलाय. पण पुण्यातील वाहतूक कोंडी सुटायचं काही नाव घेईना. त्यामुळे मंत्री नितीन गडकरी यांना पाहणी दौरा रद्द करावा लागला. त्यांनी गाडीत बसूनच अधिकाऱ्यांसोबत संवाद साधल्याचं समोर आलंय.

पित्याच्या नात्याला काळीमा; नीट’ला मार्क कमी आल्याने मुलीला बेदम मारहणा, मुलीचा मृत्यू

दौराच रद्द केला

पुण्यातील शनिवार वाडा ते स्वारगेट या भुयारी मार्गासाठीकेंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा पाहणी दौरा आज आयोजित करण्यात आलेला होता. परंतु शनिवार वाडा येथे पाहणी करण्यासाठी पोहोचले असता रस्त्यावर अचानक वाहतूक कोंडी झालीय वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या अन् वाहतूक मंत्र्‍यांची गाडी वाहतूक कोंडीत अडकली. यामुळे त्यांनी थेट दौराच रद्द केला. या घटनेमुळे पुण्यातील वाहतूक कोंडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube