UNLF Signs Peace Accord : मणिपुरातील सर्वाधिक जुना बंडखोर गट UNLF ने आत्मसमर्पण करीत हिंसाचाराचा मार्ग सोडून केंद्र सरकारसोबत शांततेचा करार केला आहे. दिल्लीत आज सर्वात जुना बंडखोर गट युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट (UNLF) ने शांतता करारावर स्वाक्षरी केली आहे. राज्यात साठ वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाहांमुळे शांतता प्रस्थापित झाली असल्याचं म्हणत मुख्यमंत्री बिरेन सिंह(Biren Singh) यांनी आभार मानले आहेत.
NCP Crisis : ‘पक्षांतर्गत निवडणूक आव्हान ठरु शकत नाही’; सुनावणीनंतर सिंघवी काय म्हणाले?
मुख्यमंत्री बिरेन सिंह म्हणाले, राज्यात शांततेसाठी वर्षानुवर्षे प्रयत्न केले जात होते, पण त्यात यश आले नाही. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आज ही स्वाक्षरी झाली. शांतता प्रस्थापित करण्यासाठी कठोर परिश्रम घेणाऱ्या पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मी आभार मानत असल्याचं बिरेन सिंह म्हणाले आहेत.
तसेच ‘UNLF च्या बंडखोर सदस्यांनी शांततेचा मार्ग अवलंबण्याचे मान्य केले आहे. त्याबद्दल मी सदस्यांचे कौतुक करतो. मला आशा आहे, राज्यातील बंडखोर आणि शस्त्रे हाती घेणारेही शांततेचा मार्ग निवडतील. मणिपूरमध्ये बंडखोर गटाची विशेष सक्ती लागू आहे, परंतु ज्या भागात परिस्थिती चांगली आणि शांततापूर्ण आहे त्या भागातून ती दूर करण्याचे काम सातत्याने केले जात आहे. आज शांतता प्रस्थापित झाली हे सर्व प्रथमच पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यामुळे घडत असल्याचं ते म्हणाले आहेत.
‘मी तुझ्याशी कधीही वाद घालणार नाही पण…’, ‘टायगर 3’मधील टॉवेल फाइट सीनवर विकीने सोडले मौन
मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी, विकासासाठी तसेच लोकांच्या कल्याणासाठी सातत्याने कार्य केले जात आहे. त्यांनी UNLF गटाचं पुढाकाराचे कौतुक केले हिंसाचाराच मार्ग सोडून ‘मुख्य प्रवाहात’ येत आहेत. अशा निर्णयानंतर चुकीच्या मार्गावर जाणाऱ्या तरुणांनाही मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्वात जुना बंडखोर गट युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट (UNLF) ने शांतता करारावर स्वाक्षरी केली आहे. केंद्रीय मंत्री अमित शाहा(Amit Shah) यांनी याबाबत एक्सवर माहिती दिली आहे. युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंटने हिंसाचार सोडून मुख्य प्रवाहात सामिल होण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून या गटावर बंदी घातल्यानंतर युनायटेड नॅशनल लिबरेशनने हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री अमित शाहा यांनी एक्सवर व्हिडिओ पोस्ट केला आहे.