Until Hindus become strong, the world will be no care of them Mohan Bhagwat’s big statement on the safety of Hindus after Pahalgam Attack : पहलगाम येथील दहशतवादी हल्ला पाकिस्तानला चांगलाच महागात (OPeration Sindoor) पडला आहे. भारताने बुधवारी 7 मार्चला मध्यरात्रीच थेट पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे (India Pakistan Tension) उद्धवस्त केले. फक्त पीओकेच नाही तर थेट पाकिस्तानात 100 किलोमीटर (Pahalgam Terror Attack) आत घुसून हल्ले केले. भारतीय सैन्याच्या या धाडसी ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी पहलगाम हल्ला आणि राष्ट्रीय सुरक्षेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते आरएसएसच्या ऑर्गनायझर या मासिकाच्या कार्यक्रमाच्या वेळी बोलत होते.
काय म्हणाले मोहन भागवत?
प्रमुख मोहन भागवत यांनी पहलगाम हल्ला आणि राष्ट्रीय सुरक्षेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, भारताकडे शक्तिशाली असण्याशिवाय पर्याय नाही. सुरक्षेची सुरुवात ही समाजापासून होते. केवळ देशापासून नाही. त्यामुळे भारताची एकता हीच हिंदूंच्या सुरक्षेची गॅरंटी आहे. हिंदू समाज आणि भारत हे एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यामुळे जेव्हा हिंदू समाज सशक्त होईल. तेव्हा भारताला देखील गौरव प्राप्त होईल.
शिवसेना अन् राष्ट्रवादी कुणी अन् का फोडली; संजय राऊतांचा थेट वार, नक्की काय म्हणाले?
त्याचबरोबर जोपर्यंत हिंदू समाज मजबूत होत नाही. तोपर्यंत जगभरात त्यांची कोणीही चिंता करणार नाही. त्यामुळे जोपर्यंत हिंदू समाज मजबूत होत नाही. तोपर्यंत जगभरातील हिंदूंना ते सुरक्षित ठेवू शकत नाहीत. तसेच यावेळी त्यांनी बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारावर देखील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले बांगलादेशातील हिंदू जेजुरी परिस्थिती ही लढत आहेत. मात्र जोपर्यंत लक्ष साध्य करत नाहीत. तोपर्यंत त्यांनी लढाई सुरू ठेवले पाहिजे. त्याचबरोबर सनातन धर्माचा जो खरा अर्थ आहे. त्याच्या संरक्षणासाठी लोकांनी जातींच्या भिंती बाजूला करून देशाचं हित जोपासले पाहिजे. शांती आणि समानतेला प्राधान्य दिले पाहिजे. त्याचबरोबर ती म्हटलं की, डॉक्टर हेडगेवार यांनी 1920 मध्येच ही कल्पना केली होती की, संपूर्ण हिंदू समाजात एकजूट असावी तेव्हाच भारत वैभवच्या शिखरावर जाईल.